नवी दिल्ली : YES बँकेला आर्थिक संकटातून बाहेर (YES Bank Financial Crisis) काढण्यासाठी आता भारतीय स्टेट बँक (SBI) पुढे सरसावली आहे. एसबीआयचे चेअरमन रजनिश कुमार (SBI Chairman Rajnish Kumar) यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी एसबीआय YES बँकेत तब्बल 2,450 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचं सांगितलं. तसेच, एसबीआय YES बँकेत 49 टक्के गुंतवणूक करु शकते, असंही त्यांनी सांगितलं.
“भारतीय रिझर्व्ह बँकेचं (RBI) ड्राफ्ट प्रपोझल आलं आहे. यानुसार, 2 रुपयांच्या (YES Bank Financial Crisis) शेअरची किंमत 10 रुपये होईल. हा प्रिमिअर रेट आहे. यावर आमची कायदेशीर टीम काम करत आहे”, असंही रजनिश कुमार यांनी सांगितलं.
हेही वाचा : YES बँकेवर आरबीआयचे निर्बंध, ग्राहकांना 50 हजारच काढता येणार
“आम्ही YES बँकेबाबत खूप ऐकलं आहे. अनेकांचा आम्हाला फोन आला. त्यामुळे या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आम्ही ही पत्रकार परिषद बोलावली”, असं रजनिश कुमार म्हणाले.
“गुंतवणूक आणि लीगल टीम यावर काम करत आहे. सोमवारपर्यंत आम्हाला आयबीआयला उत्तर कळवायचं आहे”, अशी माहिती रजनिश कुमार यांनी दिली. तसेच, रजनिश कुमार यांनी YES बँकेला एसबीआयमध्ये विलीनीकरणाच्या बातम्या फेटाळल्या. ते म्हणाले, “YES बँकेला एसबीआयमध्ये विलीन करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही”.
“YES बँकेच्या गुंतवणूकदारांना आणि खातेदारांना घाबरण्याचं कारण नाही. कारण त्यांचे पैसे सुरक्षित आहेत. तसेच, या निर्णयाचा एसबीआयच्या शेअरहोल्डर्सच्या व्याजावर कुठलाही फरक पडणार नाही”, असं सांगत रजनिश कुमार यांनी अनेक खातेदारांना चिंतामुक्त राहण्याचं आवाहन केलं.
YES बँकेवर 30 दिवसांसाठी आरबीआयची स्थगिती
आर्थिक संकटात असलेल्या YES बँकेला 30 दिवसांसाठी आरबीआयने स्थगित केलं आहे. बँकेला वाचवण्यासाठी आरबीआयने एसबीआयला पुढे केलं आहे.
एसबीआय आणि एलआयसी मिळून YES बँकेची 49 टक्के भागीदारी विकत घेऊ शकतात. तर आरबीआयची स्थगिती असेपर्यंत YES बँकेचे खातेदारक त्यांच्या खात्यातून फक्त 50 हजार (YES Bank Financial Crisis) रुपयांपर्यंतची रक्कम काढू शकतात.
संबंधित बातम्या :
आरबीआयच्या निर्बंधानंतर ‘Yes बँके’बाहेर मध्यरात्री खातेदारांच्या रांगा
YES बँकेवरील निर्बंधाचा फटका, पिंपरी चिंचवड मनपाचे तब्बल 983 कोटी रुपये अडकले
YES बँकेवरील निर्बंधावर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणतात…
Rana Kapoor | ‘YES बँके’चे माजी सीईओ राणा कपूर यांच्यावर ईडीची धाड