खासगी क्षेत्रातील येस बँकेविषयीची मोठी बातमी समोर आली आहे. या बँकेत मोठी कर्मचारी कपात करण्यात आली आहे. एकाच वेळी 500 हून अधिक कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. यामध्ये विविध विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. येत्या काळात इतर कर्मचाऱ्यांचा पण क्रमांक लागू शकतो. कॉस्ट कटिंगच्या नावाखाली कंपनीने अनेकांच्या नोकऱ्यांवर गदा आणली आहे. पण बँकेने अचानक असे पाऊल का उचलले असा प्रश्न अनेकांना सतावत आहे.
कपातीच्या धोरणांचा अनेकांना फटका
येस बँकेने ज्या 500 कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखविला आहे, त्यांना तीन महिन्यांचे वेतन देण्यात आले आहे. बिझनेस टुडेमधील वृत्तानुसार, येत्या महिन्यात कर्मचारी कपातीचे पुढील धोरण राबविण्यात येईल. बँकेच्या यादीत अनेक नावांचा सहभाग आहे. येस बँकेच्य या पावलामुळे अनेक विभाग प्रभावित झाले आहे. त्याचा परिणाम बँकिंग सेवेवर दिसेल की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
का केली कर्मचारी कपात?
वृत्तानुसार, यस बँकेतील ही कर्मचारी कपात, येस बँकेच्या रिस्ट्रक्चरिंग प्रक्रियेतंर्गत करण्यात आली आहे. त्यात कॉस्ट कटिंगचा दावा करण्यात आला आहे. बँक डिजिटल बँकिंगवर लक्ष केंद्रीत करत आहे. तर मानवीय सेवांमध्ये कपातीचे धोरण राबवित आहे. बँक ऑपरेशनल खर्चांत कपातीचा प्रयोग राबवित आहे. पण त्याचा फटका अनेक कर्मचाऱ्यांना बसला आहे.
शेअर बाजारात दिसेल परिणाम
येस बँकेच्या कर्मचारी कपातीचा शेअर बाजारात दिसून आला. आज दुपारपर्यंत एनएसईवर येस बँकेच्या शेअरमध्ये 0.75 टक्क्यांची कपात दिसली. बँकेचा शेअर 24.02 रुपयांवर बंद झाला. बुधवारी बँकिंग स्टॉकची सुरुवात उसळीने झाली होती. पण सकाळी 10:15 वाजता शेअरमध्ये घसरणीला सुरुवात झाली होती. हा शेअर दुपारी 2:14 वाजता 23.83 रुपयांवर ट्रेड करत होता.
सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल. पेनी शेअरमध्ये गुंतवणूक करताना जागरुक राहा. कंपनीचे फंडामेंटल तपासा. भूलथापांना अजिबात बळी पडू नका.