मुंंबई : तुम्ही ग्रॅज्यूएट वडापाववाला पाहीला असेल, ऑडी चहावाला पाहीला ( Audi Chaiwala ) असेल, असाच एक एमबीए चहावालाही ( Mba Chaiwala ) आहे. काम किंवा धंदा कुठलाही छोटा नसतो, तुम्ही मनापासून मेहनत केली की यश पायाशी लोळण घेतेच हे या तरूणाने दाखवून दिले आहे. आणि चहा विक्रीतूनही नफा कमविता येतो हे सिद्ध करणाऱ्या या तरूणाचे नाव आहे.. प्रफुल्ल बिल्लोर ( Prafull-Billore ) त्याने चहा विक्रीतून त्याचे आयुष्यच संपूर्ण बदलून गेले त्याने अवघ्या चोवीसव्या वर्षी तो करोडपती झाला आहे. परंतू त्याचा हा प्रवास अगदी सोपाही नव्हता, त्यामागे प्रचंड मेहनत आणि चिकाटी आहे.
प्रफुल्ल बिल्लोर याला लोक MBA चहावाला म्हणूनच ओळखतात. त्याला कमी वयात हे यश मिळालं कसं ते पाहूया. त्याने छोटी..छोटी पावले टाकत हे यश मिळविले. त्याला आई-वडीलांची नातेवाईकांची बोलणी खावी लागली यातून तावून सुलाखून तो आता यशस्वी उद्योजक झाला आहे.
प्रफुल्लला एमबीए करायचं होतं. परंतू अनेकवेळा प्रयत्न करूनही तो काही प्रवेश परीक्षा पास होऊ शकला नाही. त्यामुळे निराशा पदरी आल्याने त्याला त्याने वेगवेगळ्या शहरात जाऊन तेथील अभ्यास केला. चेन्नई, मुंबई, हैदराबाद या शहरात जाऊन त्यांनी पाहीले आणि अनुभव घेतला नोकरी केली.
प्रफुल्ल याने नंतर अहमदाबाद येथील मॅकडोनल्ड मध्ये डीलीव्हरी बॉयची नोकरी केली. येथे त्याला एका तासाचे 37 रुपये मिळायचे, त्यानंतर त्याची मेहनत पाहून त्याचे प्रमोशन झाले आणि तो वेटर बनला. नोकरी करताना त्याच्या मनात विचार आला की परदेशी कंपनी जर आपल्या देशात येऊन बर्गर विकून नफा कमवित असेल तर आपण काही आपल्याच देशात काही करू शकत.? मग त्याने अभ्यास करायला सुरुवात केली आणि मग चहा हेच एकमेव पेय आहे. ज्याला अख्ख्या भारतात मागणी आहे.
प्रफुल्लला स्वत:चा कॅफे सुरु करायचा होता. परंतू पैशांची कमी होती. मग त्याने चहा स्टॉल लावला, खोटं बोलून त्याने आई-वडीलांकडून पैसे घेतले आणि स्टॉलसाठी भांडी अन्य वस्तू विकत घेतल्या धंदा सुरु केला. प्रफुल्ल सकाळी 9 ते 6 वाजेपर्यंत मॅकडोनल्डमध्ये काम करायचा आणि नंतर सायं. 7 ते 11 त्याने चहाचा स्टॉल सुरु केला. धंदा सुरूवातीला झाला मग नोकरी सोडली. परंतू काही जलाऊ लोकांनी स्टॉल बंद करायला भाग पाडले.