जगभरात एकापेक्षा एक असे अनेक यशस्वी उद्योजक आहेत. ज्यांनी शून्यातून सुरूवात करून यशाचं शिखर गाठलं. याच पठडीत एक असं नाव आहे, ज्यांनी आपलं घर चालण्यासाठी शाळा सोडली. डिलिव्हरी बॉय म्हणून कामाला सुरूवात केली. पण, त्याच डिलिव्हरी बॉयने आपल्या मेहनतीच्या, कर्तुत्वाच्या बळावर यशाची एकेक पायरी चढली. यशस्वी उद्योजक झाला. करोडो रुपयांची त्याची मालमत्ता जमली. इतकंच नाही तर त्या उद्योजकाने जगातील श्रीमंत लोकांच्या यादीत आपले नाव नोंदवले. हा यशस्वी उद्योजक दुसरे तिसरे कोणी नाही तर झारा कंपनीचे मालक अमानसियो ऑर्टेगा आहे.
झारा ही जगातील एक मोठी फॅशन ब्रँड कंपनी आहे. कंपनीचे मालक अमानसियो ऑर्टेगा यांनी अर्ध्यातून शाळा सोडली होती. एक डिलिव्हरी बॉय म्हणून त्यांनी काम केलं होतं. कधी काळी डिलिव्हरी बॉय असलेल्या अमानसियो ऑर्टेगा यांच्याकडे सद्य स्थितीत 1 लाख कर्मचारी आणि 80 देशात 2000 पेक्षा जास्त शॉप्स आहेत. या कंपनीचे गेल्या 19 वर्षात नुकसान झाले नाही. महत्त्वाचं म्हणजे कोरोना महामारीच्या काळातही कंपनी तोट्यात गेली नाही. हे सगळ झारा कंपनी कस मॅनेज करते? या कंपनीचे मुख्य तत्वज्ञान काय आहे? काय असे कंपनीचे सिक्रेट आहेत ज्यामुळे कंपनी आज इतकी सक्सेसफुल आहे ते ही तोटा न बघता. त्यांचे बिझनेस तंत्र नेमके काय आहे? जे आपल्याला आत्मसात करून घेत तुम्हीही आपल्या व्यवसायांमध्ये याचा उपयोग करून उद्योग वाढवू शकता.
झारा कंपनीचे मालक अमानसियो ऑर्टेगा यांचा जन्म स्पेनमध्ये झाला होता. आपल्या भावंडांमध्ये ते सर्वात लहान होते. वडील रेल्वे विभागात कामाला होते. कमी वेतन असल्यामुळे घरात गरिबीच्या झळा चांगल्याच बसत होत्या. त्यांची आईसुद्धा इतर घरांमध्ये काम करायची. आपली घरातील ही परिस्थिती पाहून अमानसियो ऑर्टेगा यांनी 14 व्या वर्षी शाळा सोडली. सुरूवातीला ‘गाला’ या टी शर्ट कंपनीमध्ये त्यांनी डिलीव्हरी बॉय म्हणून कामाला सुरूवात केली. इथे काम करत असताना त्यांनी स्वत: हाताने कपडे शिवले, त्यासोबतच ग्राहकांनाही चांगल्या प्रकारे हाताळू लागल्याने संपूर्ण शॉप ते एकटे पाहावू लागले होते. या प्रगतीमुळे काही दिवसताच त्यांच्याकडे वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून जबाबदारी दिली.
जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ते स्वत: कपडे शिवत होते. या कपड्यांची कमी पैशांमध्ये बाजारात विक्री करू लागले. त्यांचे डिझाईन लोकांना आवडू लागले आणि कपड्यांचा खप चांगला होऊ लागला. मार्केटमध्ये मागणी वाढू लागल्याने बेरोजगार महिलांना हाताशी धरत त्यांनी व्यवसायाची सुरूवात केली. 25 डॉलरची गुंतवणूक करत त्यांनी पहिला व्यवसाय सुरू केला. यामधील रोसालिया मेरासोबत त्यांनी 1966 ला लग्न केलं. हा व्यवसाय चांगला सुरू झाल्यावर आपला स्वत:चा ब्रँड असावा म्हणून त्यांनी 1975 मध्ये ‘झोब्रा’ असं नाव ठेवत सुरूवात केली. आपल्या आवडत्या सिनेमाचं नाव त्यांनी या शॉपला ठेवलं होतं. मात्र, भविष्याचा नावावरून काही वाद नको व्हायला म्हणून त्यांनी ‘झारा’ ZARA असं नाव ठेवलं. कोणताही ब्रँड हा बनत नसतो, त्याला बनवावा लागतो. अमानसियो ऑर्टेगा यांनी एक साधी कंपनी सुरुवात केली आणि फक्त बुद्धीने बिजनेस करत मोठा ब्रँड बनवला. त्यानंतर झाराने कोणती स्ट्रेटेजी वापरली की आता जगभरात झारा इतका मोठा ब्रँड झालाय जाणून घ्या.
लहानपणी बघा, सोनपरी, शकालाका बुंबुम यामध्ये सोनपरीची जादूची छडी आणि शकालाका बुंबुम मधील जादूची पेन्सिल जरी सत्यात नसली तरी त्याचे आकर्षण वाटेल अशीच होती. तिची आवड बघता मार्केटमध्ये तशा दिसणारी पेन्सिल आणि छडी आली. ती ज्याच्याकडे असायची बाकी मुले त्यांच्याकडे कुतूहलाने बघायची. सिंपल आहे, आजच्या जगात ज्याच्याकडे आय फोन तो श्रीमंत असे मानले जाते. त्यामुळे झाराने हे ओळखले की, आता फोन कपडे हे इन्स्ट्रुमेंट स्टेटस मानले जात आहे. मात्र, त्यासोबत झाराने हे देखील ओळखले की, फॅशनचे आकर्षण हे वाढत आहे. लोकांचा कल हा luxuries स्टेट्सकडे वळत आहे आणि कपड्यांमध्ये स्टाइलही luxuries ची व्याख्या बनत चालली आहे. मग, त्यामध्ये लोकांचे हे सुद्धा प्यारामिटर आहेत की आपल्या बजेटमध्ये लोक फॅशनवाले कपडे घेत आहेत. झाराने दोन गोष्टींचे समीकरण तयार केले. फॅशन = व्हरायटी + डिझाईन, हे का? तर झाराने निरीक्षण केले की, फॅशनची आवड असलेले ग्राहक क्वालिटीच्या मागे न धावता व्हरायटी आणि डिझाईन मागे पळत आहेत.
बाकी ब्रँड दर तीन महिन्यांनी नवीन स्टॉक मार्केटमध्ये आणायचे. त्यात ते महाग आणि कमी. यामुळे मार्केटमध्ये मागणी जरी असली तरी ग्राहक समाधानी नसायचा. झारा कंपनीने एक मस्त फंडा वापरला. कमी खर्चात कपडा आणण्यापासून ते बनवण्यापर्यंत काम केले. ते मार्केट मध्ये कमी किंमतीत आणि जास्त प्रमाणात आणलं. झाराचा याला मोठा फायदा झाला, ग्राहकांचाही झारा ब्रँडचे कपडे खरेदी करण्यासाठी आकर्षण वाढलं.
झारा देशभर फिरले आणि मार्केटमध्ये नक्की कोणती फॅशन ट्रेंड करत आहे, हे पाहिले. आपल्या डिझायनरला त्यासारखे प्रॉडक्ट उत्पादन करण्यास सांगितले. मार्केटमध्ये झाराची किंमत वाढत गेली. कारण, जिथे बाकी ब्रँड दोन ते तीन महिन्याला नवीन व्हरायटी त्यांच्या शॉपमध्ये आणायचे. तर झारा दर आठवड्याला नवीन व्हरायटी त्याच्या शॉपमध्ये आणायची. याला म्हणतात ‘फास्ट फॅशन सप्लाय चेन’ यामुळे ग्राहक जास्त आकर्षित झाले आणि एकाच्या बदल्यात ज्यास्त व्हरायटी मिळत असल्याने ग्राहक दोन कपडे खरेदी करू लागले. यामुळे झाराचा सेल मोठ्या प्रमाणात वाढला.
जस्ट इन टाईम प्रोडक्शन म्हणजे कंपनी आधीच 3 चॉईसच्या व्हरायटी बनवते आणि आणि ग्राहकांच्या सोयीसाठी ते विक्री करतात. दुसरीकडे जस्ट इन केस प्रोडक्शन, म्हणजे ग्राहकांच्या मागणीनुसार प्रॉडक्ट उत्पादित करायचे. झाराने या दोन्ही पद्धतींचा अवलंब केला. म्हणजे झाराने जस्ट इन टाईम आणि जस्ट इन केस प्रोडक्शन तयार केले. जेणेकरून ग्राहक जास्त आकर्षित होऊन जास्त प्रॉडक्ट विकत घेतील. याला ग्राहकांनीही चांगला प्रतिसाद दिला. म्हणजे विचार करा ना, एक कंपनी जी ब्रँड मानली जात आहे, जी व्हरायटी देते ते ही आठवड्याला आणि महत्त्वाचं म्हणजे कंपनी परवडणाऱ्या दरात सगळ काही पुरवते. झारा बनवलेले कपडे हे 10 ते 15 वेळा वॉश करून बाजारात आणले असायचे, त्यामुळे क्वालिटी टेस्ट देखील इथे होत असे. जे बाकी ब्रँड च्या तुलनेत कमी पहायला मिळायचे. यामुळे फॅशनेबल कपडे आणि दर्जा म्हटलं की ग्राहकांची पसंती झारा कंपनीला जास्त राहायची.
झारा आपल्या कपड्यांमध्ये ग्राहकांनी क्वालिटी, क्वांटिटी आणि व्हरायटी बाजारात देत आहे. म्हणजे एक्झॅक्ट ग्राहकांना जे हवं ते. त्यामुळे झाराची ओळख आर्ट ऑफ फॅशन ब्रँड अशी बनली. झाराचे 300 डिझायनर वर्षाला 12000 डिझाईन मार्केट मध्ये आणू लागले. हेच कारण आहे ज्यामुळे 80 देशात 2000 पेक्षा जास्त शॉप्स आहेत. दिवसेंदिवस ग्राहकांचा विश्वास वाढत गेला आहे. इकडे झाराच्या कपड्यांची मागणी वाढली. ग्राहक लॉयल बनले, कंपनी वाढली, मग लोकांना रोजगार मिळत गेला, व्यवसाय वाढत गेला आणि त्यामुळे सरकार सुध्दा टॅक्स मिळत गेला.
आता तुम्हाला समजले असेल कसा झाराने आपला बिजनेस वाढविला आणि करोडोंचा प्रॉफिट कमवला. मार्केटमध्ये तुम्हाला एखादा व्यवसाय वाढवायचा असेल तर झाराच्या या स्ट्रॅटर्जी समजून घ्या. जर तुम्हाला मोठ्या स्तरावर बिजनेस करायचा असेल तर हे ओळखायला शिका की नक्की ग्राहकांची गरज आणि बाजारात काय चालतं आहे. दुसरं म्हणजे, ग्राहकांच्या गरजेसोबत त्याची गरज किती प्रमाणात आहे आणि लोक किती किमतीपर्यंत ते विकत घेऊ शकतात. तिसरे म्हणजे, बघण्याची नाही निरीक्षणाची तयारी ठेवा. तरंच तुम्ही रिसर्च करून तुम्ही काहीतरी नवीन उत्पादित करू शकता.