नवी दिल्ली | 19 जानेवारी 2024 : नवीन आर्थिक वर्षाला 1 एप्रिलपासून सुरुवात होईल. यापूर्वी 1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण देशाचे बजेट सादर करतील. अर्थात नोकरदारांना आयकरात किती सवलत, सूट मिळते हे महत्वाचे असते. कारण उत्पन्नावर जेवढा कर वाचवता येईल, तितकीच चाकरमान्यांना बचत करता येते. तुम्हाला एचआर विभागाने एक मेल पाठवला असेल. त्यात आर्थिक वर्ष
2023-24 साठी गुंतवणूकीसंबंधीचे पुरावे मागितले असतील.या एका ट्रिकमुळे तुम्हाला 12 लाखांच्या उत्पन्नावर एक रुपया पण कर भरण्याची गरज नाही.
असा वाचेल 12 लाखांच्या पगारवर कर
जर तुमचा पगार वार्षिक 12 लाख रुपये असेल तर या स्टेप्स फॉलो करुन तुम्हाला कराची रक्कम वाचवता येईल. त्यामुळे तुम्हाला इनकम टॅक्स द्यावा लागणार नाही. त्यासाठी तुम्ही तुमच्या एचआर विभागाची मदत घेऊ शकता. मुख्यतः हाऊसिंग रेंट अलाऊन्स (HRA), लीव ट्रॅ्व्हल अलाऊंज (LTA), हेल्थ इन्शुरन्स, लाईफ इन्शुरन्स यासारख्या सुविधांचा यामध्ये वापर करण्यात येतो.
सॅलरी स्ट्रक्चर कॅलक्युलेशन
सॅलरी 12 लाख रुपये असेल तर तुम्हाला तुमच्या पगाराचे नियोजन करावे लागेल. त्यासाठी HRA 3.60 लाख रुपये, LTA 10,000 रुपये आणि टेलिफोनचे बिल 6,000 रुपये असायला हवे. एकूण वेतनावर तुम्हाला डिडक्शनचा असा लाभ मिळेल.
नाही द्यावा लागणार आयकर
सर्व डिडक्शन आणि सवलत जोडल्यास तुमचे करपात्र उत्पन्न केवळ 4,96,500 असेल. त्यानंतर तुमची करपात्र कमाई 5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल. त्यावर करदात्याला कोणताही कर द्यावा लागत नाही. हाच तो फॉर्म्युला आहे. त्यामुळे तुम्हाला 12 लाख रुपयांची कमाई कर मुक्त करता येईल.
HR मनाई केल्यास?
जर तुमच्या कंपनीचे एचआर सॅलरी स्ट्रक्चर टॅक्स फ्रेंडली करण्याच्या तयारीत नसेल तर तुम्हाला दुसरा पर्याय समोर ठेवावा लागेल. त्याआधारे तुम्ही उत्पन्न करमुक्त करु शकता.