नवी दिल्ली | 12 ऑगस्ट 2023 : ऑनलाईन स्टॉक ब्रोकर झिरोधा (Zerodha Brokers) आता म्युच्युअल फंडच्या कारभारात उतरणार आहे. शेअर बाजारात झिरोधाचे वापरकर्ते मोठ्या प्रमाणात आहे. आता म्युच्युअल फंडात पण ही कंपनी काम करणार आहे. त्यासाठी या कंपनीला SEBI ने मंजूरी दिली आहे. एसेट मॅनेजमेंट कंपनी, झिरोधा फंड हाऊस गठित करण्यासाठी भारतीय प्रतिभूती आणि विनिमय बोर्डाने (SEBI) मंजूरी दिली आहे. शुक्रवारी याविषयीची घोषणा एक संस्थापक आणि सीईओ नितीन कामथ यांनी केली. त्यांनी माहिती देणारे ट्विट पण केले आहे. कंपनी म्युच्युअल फंड बाजारात (Mutual Fund Market) आल्यावर ती धुमाकूळ घालू शकते. रिलायन्सची नवीन जिओ फायनेन्शिअल सर्व्हिसेज कंपनीला ही कंपनी आव्हान देऊ शकते, असे काही तज्ज्ञांना वाटते.
काय आहे ट्विट
“आम्हाला झिरोधा एएमसीसाठी अंतिम मंजूरी मिळाली आहे. त्यासाठी स्मॉलकेस सोबत भागीदारी करण्यात येत आहे.” झिरोधाचे नितीन कामथ यांनी ही माहिती दिली. या नवीन एसेट मॅनेजमेंट कंपनीचे (AMC) सीईओ विशाल जैन असतील.
झिरोधाने 3 वर्षांपूर्वी केला होता अर्ज
झिरोधाने म्युच्युअल फंडात उलाढाल सुरु करण्यासाठी झिरोधाने तीन वर्षांपूर्वी अर्ज केला होता. फेब्रुवारी, 2020 मध्ये त्यासाठी अर्ज करण्यात आला होता. झिरोधा आणि स्मालकेसने एप्रिलमध्ये संयुक्त उलाढालीची घोषणा केली होती. त्याचवेळी म्युच्युअल फंडात एकत्रिक काम करण्याची दोघांनी घोषणा केली होती.
We just received the final approval for the @ZerodhaAMC we are building in partnership with @smallcaseHQ.
Our motivation to start a mutual fund was twofold. The first was that the biggest challenge and opportunity for Indian markets is the shallow participation. Even after…
— Nithin Kamath (@Nithin0dha) August 11, 2023
म्युच्युअल फंडचा पर्याय का
म्युच्युअल फंड उद्योगात उडी घेण्याचा निर्णय का घेतला, याचे विश्लेषण नितीन कामथ यांनी केले. भारतीय बाजारात सध्या तीव्र स्पर्धा तर आहेच, तितकीच मोठी संधी पण असल्याचा दावा कामथ यांनी केला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडे 6-8 कोटी युनिक म्युच्युअल फंड आणि इक्विटी गुंतवणूकदार आहेत.
काय आहे उद्देश
म्युच्युअल फंडात आल्यानंतर पुढील रणनीती काय असेल हे कंपनीने स्पष्ट केले. गुंतवणूकादरांना जागरुक तर करण्यातच येईल. पण सध्या म्युच्युअल फंडात काय करता येईल, हे कंपनीने सांगितले. त्यानुसार, कंपनीचे लक्ष सर्वात अगोदर इंडेक्स तयार करणे हा आहे. यामध्ये सरळ फंड आणि ईटीएफ तयार करणे आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना गुंतवणूक करणे अत्यंत सोपे होईल. त्याचे लक्ष्य निश्चित करता येईल. त्यातून होणाऱ्या फायद्याचे गणित समजेल.
या कंपनीला पण मिळाली मंजूरी
झिरोधाशिवाय हेलियो मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला पण सेबीने हेलियोस म्युच्युअल फंडसाठी मंजूरी दिली आहे. हेलियोस कॅपिटलला म्युच्युअल फंडात उलाढालीसाठी सेबीने सप्टेंबर 2022 मध्ये तत्वतः मान्यता दिली.