नवी दिल्ली– केंद्रीय स्पर्धा आयोगाच्या (Competition Commission of India) चौकशी आदेशानंतर आघाडीच्या फूड डिलिव्हरी कंपन्या स्विगी आणि झोमॅटोचे (Swiggy and Zomato) शेअर्स गडगडले आहेत. स्पर्धा आयोगानं दोन्ही कंपन्यांचे व्यवसाय प्रारुप आणि कार्यपद्धती तपासणीचे आदेश जारी केले आहेत. येत्या 60 दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश जारी केले आहेत. आजच्या शेअर बाजारातील व्यवहारादरम्यान झोमॅटोचा शेअर 5 टक्क्यांच्या घसरणीसह 82.15 वर पोहोचला. फूड डिलिव्हरी (Food Delivery) कंपनीचा स्टॉक गेल्या महिन्यांत 75.55 रुपयांच्या नीच्चांकी पातळीवर पोहोचला होता. तर गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात 169.10 रुपयांच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचला होता. झोमॅटोने आयपीओच्या माध्यमातून 9,375 कोटी रुपये उभारले होते. झोमॅटो आणि स्विगी विरोधात नॅशनल रेस्टॉरेंट असोसिएशन ऑफ इंडियाने तक्रारीचा पाढा लावला होता. दोन्ही फूड डिलिव्हरी कंपन्यानी देशभरातील हॉटेल आणि रेस्टॉरेंट मध्ये व्यवहारात अनुचित प्रकार केल्याचा दावा रेस्टॉरेंट संघटनेने केला होता.
झोमॅटो ही आघाडीची भारतातील फूड डिलिव्हरी कंपनी मानली जाते. तब्बल 23 देशांमध्ये कंपनीच्या कारभाराचा विस्तार आहे. झोमॅटोचा आयपीओ शेअर बाजारातील दुसरा सर्वात मोठा आयपीओ ठरला होता. झोमॅटोने 9 हजार कोटींची उभारणी आयपीओच्या माध्यमातून केली होती.
शेअर बाजारातील (SHARE MARKET) तेजीच्या सत्राला आज ब्रेक लागला. आज (मंगळवार) प्रॉफिट बुकिंगमुळे घसरणीला सामोरं जावं लागलं. सेन्सेक्स 435 अंकांच्या घरसणीसह 60176 च्या स्तरावर पोहोचला. निफ्टीत 96 अंकांच्या घसरणीसह 17957 वर बंद झाला. आज सेन्सेक्स वर टॉप-30 पैकी 13 शेअरमध्ये तेजी आणि 17 शेअर्समध्ये घसरण झाली. गुंतवणुकदारांच्या प्रॉफिट बुकिंग धोरणामुळे एचडीएफसी बँक, बजाज फायनान्शियल्स सर्व्हिस आणि एचडीएफसीत सर्वाधिक घसरण झाली.
झोमॅटो ही एक भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे. या कंपनीची स्थापना 2008 मध्ये झाली. ही कंपनी रेस्टॉरंटचा तपशील आणि त्यावरील उपलब्ध खाद्यपदार्थ ग्राहकांना त्याच्या वेबसाईट आणि अॅपद्वारे उपलब्ध करुन दिले जाते. या अॅपमध्ये रेस्टॉरंटबद्दल रिव्ह्यू देखील आहेत. जेणेकरून ग्राहकांना रेस्टॉरंटच्या अन्नाची गुणवत्ता जाणून घेता येईल. या कंपनीच्या सेवा 24 हून अधिक देशांमधील 10,000 हून अधिक शहरांमध्ये आहेत. आधी या कंपनीचे नाव फुडीबी होते जे नंतर बदलून झोमॅटो करण्यात आले.
SHARE MARKET: शेअर बाजारात नफेखोरी, सेन्सेक्स गडगडला; 435 अंकांची घसरण
Semiconductor crisis: सेमीकंडक्टरचा तुटवडा वाहन उद्योगाच्या मुळावर, वाहन विक्रीत मोठी घट
IIT Kanpur : बापरे बाप! शंभर कोटींची गुरुदक्षिणा, कोण आहे देणगी देणारा कोट्यधीश विद्यार्थ्यी?