पुणे, इंडियन आर्मी कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग, पुणे (military Engineering Collage Pune) ने गट क श्रेणीच्या पदांसाठी भरती (Recruitment) अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. मिलिटरी इंजिनिअरिंग कॉलेजने प्रसिद्ध केलेल्या भरती सूचनेनुसार, या कॉलेजमध्ये अकाउंटंट, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक सारख्या पदांसाठी नोकऱ्या आहेत. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज मिलिटरी इंजिनिअरिंग कॉलेज cmepune.edu.in या वेबसाइटला भेट देऊन करता येईल. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 फेब्रुवारी 2023 आहे. जर तुम्हाला भारतीय सैन्याचा भाग व्हायचे असेल तर CME पुणे वेबसाइटवर अर्ज करा.
उमेदवार 10वी/12वी उत्तीर्ण असावा. यासोबतच संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय केलेले असणे आवश्यक आहे.
18 ते 30 वर्षांच्या दरम्यान.
18000 ते 81000 रुपये प्रति महिना
सर्वप्रथम तुम्ही जी कोणती स्पर्धा परीक्षा देणार असाल त्या त्या परीक्षेचा तुम्हाला
1. अभ्यासक्रम
2. परीक्षेचे स्वरूप
3. मागील प्रश्नपत्रिका
4. तो अभ्यासक्रम समाविष्ट असलेली पुस्तके आणि संदर्भ साहित्य
या 4 प्रमुख गोष्टी माहिती असणे अति आवश्यक आहे. या चारही अथवा या चारपैकी एकाबद्दल देखील तुम्ही अनभिज्ञ असाल तर तुम्ही वाघाच्या शिकारीसाठी मोकळ्या हातानी जात आहात असे होईल!
या चार व्यतिरिक्त देखील काही गोष्टी आहेत जसे की कट ऑफ किती लागतो? आपले प्रतिस्पर्धी कोण आहेत इत्यादी मात्र आपली स्पर्धा फक्त आणि फक्त स्वत:शीच आणि परीक्षेबाबतीत गुणांशी आहे हे कधीच विसरायचं नाही.
स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम पाहून परीक्षेचे स्वरूप समजून घेऊन मागील प्रश्नपत्रिकांचा शक्य तितक्या बारकाईने अभ्यास करायचा त्यांनतर पुस्तकांमधून अभ्यास सुरु करून केलेल्या अभ्यासाचा सराव प्रश्न आणि हळूहळू वेळ लावून प्रश्न पत्रिका सोडविण्याचा सराव करावा.