अग्निवीरांना मिळणार 30 टक्के कपातीसह वेतन; चार वर्षानंतर हाती येणार दहा लाखांची रक्कम

| Updated on: Jun 20, 2022 | 3:10 PM

Agnipath Scheme Salary: अग्निवीरांना 30 टक्के रक्कम कपात करुन वेतन मिळणार आहे. दरवर्षी वेतनात ठराविक वाढ मिळणार आहे.चार वर्षात कपात झालेली रक्कम जमा होईल. त्यात सरकार त्यांची रक्कम जोडेल आणि चार वर्षात अग्निवीरांच्या खात्यात दहा लाखांची रक्कम जमा झालेली असेल.

अग्निवीरांना मिळणार 30 टक्के कपातीसह वेतन; चार वर्षानंतर हाती येणार दहा लाखांची रक्कम
अग्निवीरांना एकरक्कमी वेतन
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

अग्निपथ योजनेवरुन (Agnipath Scheme) देशात वातावरण धुमसत आहे. अनेक राज्यात तरुणांनी बंद पाळला आहे. काही स्थानिक नेत्यांनीही बंदला पाठिंबा दिला आहे. गेल्या तीन दिवसांपासून अग्निपथ योजनेवरुन जोरदार निदर्शने सुरु आहेत. निदर्शकांनी उत्तर भारतात तर अनेक रेल्वेगाड्या आगीत झोकून दिल्या. सरकारने तातडीने या योजनेशी संबंधी अनेक सवलती आणि आश्वासनांचा पाऊस पाडला असला तरी विरोध मात्र म्हणावा तसा कमी झालेला नाही. तरीही तीनही सैन्य दलांनी (Armed Forces) या योजनेतंर्गत भरती प्रक्रिया राबविण्यासाठीची अधिसूचना जाहीर केली आहे. येत्या 4 ते 5 दिवसांपासून ही भरती प्रक्रिया (Recruitment Process) सुरु होईल. या योजनेशी संबंधित आणखी एक महत्वाचा निर्णय झाला आहे. अग्निवीरांना 30 टक्के रक्कम कपात करुन वेतन मिळणार आहे. दरवर्षी वेतनात (Salary) ठराविक वाढ मिळणार आहे.चार वर्षात कपात (Deduction) झालेली रक्कम जमा होईल. त्यात सरकार त्यांची रक्कम जोडेल आणि चार वर्षात अग्निवीरांच्या खात्यात दहा लाखांची रक्कम जमा झालेली असेल.

30 टक्के वेतन होणार कपात

सरकारच्या अधिसूचनेनुसार, अग्निपथ योजनेतंर्गत भरती होणा-या अग्निवीरांना दर महिन्याला मिळणा-या वेतनात 30 टक्के कपात करण्यात येणार आहे. दरमहिन्याला जमा होणारी ही रक्कम त्यांना निवृत्तीनंतर एकरक्कमी देण्यात येईल. अधिसूचनेनुसार, पहिल्या वर्षी अग्निवीरांना एकूण वेतन 30 हजार रुपये असेल. यामध्ये सेवा निधी फंड साठी 30 टक्के म्हणजे 9 हजार रुपये कपात करण्यात येतील. म्हणजेच पहिल्या वर्षी अग्निवीरांच्या हातात कपात करुन मिळणारे वेतन हे 21 हजार रुपये असेल. सेवा निधी फंडात जमा झालेली रक्कम चार वर्षानंतर एक रक्कमी अग्निवीरांच्या हाती देण्यात येईल.

हे सुद्धा वाचा

असा वाढेल पगार

सरकारने दिलेल्या माहितीनुसार, दुस-या वर्षी अग्निवीरांना पगारात 10 टक्क्यांची वाढ देण्यात येईल. दुस-या वर्षी अग्निवीराचे एकूण वेतन प्रति माह 33 हजार रुपये होईल. यातील 9,900 रुपये हे सेवा निधी फंडात जमा होतील आणि अग्निवीराच्या हातात 23,100 रुपये वेतन येईल. तिस-या वर्षी त्यांना एकूण 36,500 रुपये वेतन मिळेल. त्यातील 10,950 रुपये सेवा निधी फंडात जमा होतील तर इन-हँड-सॅलरी असेल 25,550 रुपये. चौथ्या आणि अंतिम वर्षात अग्निवीरांचे एकूण वेतन 40 हजार रुपये असेल. कपात करुन त्यांच्या हातात दर महिन्याला 28 हजार रुपये वेतन मिळेल. 12 हजार रुपये सेवा निधी फंडात जमा करण्यात येतील. म्हणजेच चार वर्षांत 5.02 लाख रुपये फंडात जमा होतील. तर सरकार या फंडात तेवढीच रक्कम जमा करेल. चार वर्षाच्या सेवेनंतर निवृत्तीवेळी (retirement benefits) अग्निवीरांच्या खात्यात एकरक्कमी 10.04 लाख रुपये जमा होतील.