अमरावती : राज्यामधील जिल्हा परिषदेच्या मेगा भरतीला सुरूवात झाली आहे. 34 जिल्हा परिषदांसाठी तब्बल 19,460 जागांची भरती प्रकिया होणार आहे. यातील अमरावती जिल्ह्यामध्ये 653 जागा भरण्यात येणार आहेत. 5 ऑगस्टपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.
ऑनलाईन पद्धतीने 5 ऑगस्टपासून अर्ज करता येणार असून 25 ऑगस्ट ही अंतिम तारीख असणार आहे. या परीक्षेसाठीचे उमेदवारांचे प्रवेशपत्र परीक्षेच्या 7 दिवस आधी मिळणार आहे. या पराक्षेसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 18 ते 38 आणि मागासवर्गीय उमेदवारासांठी 18 ते 43 इतकी असणार आहे. तर दरमहा वेतन हे 19,900 ते 1,12,400 इतका असणार आहे. हा फॉर्म भरताना खुल्या वर्गासाठी 1000 रूपये तर मागासवर्गीयांसाठी 900 रूपये इतकं आहे.
(अनुसूचित क्षेत्राबाहेरील (बिगर पेसा)/ अनुसूचित क्षेत्रातील (पेसा)) सरी पदे पदभरतीसाठी घोषित केलेली संवर्गनिहाय सरळसेवेची रिक्त पदे
आरोग्य पर्यवेक्षक 02, आरोग्य सेवक (पुरुष) ४०% 14, आरोग्य सेवक (पुरूष) ५०% 79, आरोग्य सेवक (महिला) 304, औषध निर्माण अधिकारी 28, कंत्राटी ग्रामसेवक 67, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / ग्रा.पा.पु.) 59, कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) 02, कनिष्ठ आरेखक 3,कनिष्ठ यांत्रिकी 1, कनिष्ठ लेखाधिकारी 1, कनिष्ठ सहाय्यक (लिपीक) 18, कनिष्ठ सहाय्यक लेखा 5, जोडारी 1, पर्यवेक्षिका 8, पशुधन पर्यवेक्षक 11, प्रयोगशाळा तंत्रज्ञ 2, यांत्रिकी 1, रिगमन (दोरखंडवाला) १, वरिष्ठ सहाय्यक (लिपीक)3, वरिष्ठ सहाय्यक लेखा 2, विस्तार अधिकारी (कृषि) 2, विस्तार अधिकारी (शिक्षण) (वर्ग३ श्रेणी२) 7, विस्तार अधिकारी (सांख्यिकी) 3, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम / लघुपाटबंधारे) 30 अशा एकूण एकूण 653 जागांची भरती होणार आहे.
जिल्हा परिषदेतील भरती प्रक्रिया इंस्टीट्यूट ऑफ बँकिंग सिलेक्शन या संस्थेकडून राबण्यात येणार आहे. ही संस्था भरतीसाठी परीक्षा घेणार आहे. जिल्हा परिषदेतील विविध ३४ विभागांसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे. परीक्षेसाठी अभ्यासक्रमाचा पॅटर्न मात्र जिल्हा परिषदेने तयार केला आहे.