मुंबई : शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तरुणांना वेध लागतात ते नोकरीचे..अनेक जण आपल्या क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी धडपड करतात. बँकेच्या नोकरीसाठी तयारी करणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शनने विविध सरकारी बँकांमध्ये लिपिक पीओसह अनेक पदांवर भरतीची अधिसूचना जारी केली आहे. ऑफिस असिस्टंट (लिपिक), ऑफिसर स्केल-I/PO (असिस्टंट मॅनेजर) आणि ऑफिसर स्केल 2 (व्यवस्थापक) आणि ऑफिस स्केल 3 (वरिष्ठ मॅनेजर) या पदांसाठी एकूण 8612 पदांची भरती करायची आहे. या पदांवर निवडलेल्या उमेदवारांच्या नियुक्त्या विविध ग्रामीण बँकांमध्ये जातील. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 1 जून 2023 पासून सुरू झाली आहे. उमेदवार IBPS ऑनलाइन ibps.in च्या अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जून 2023 आहे.
या विविध पदांसाठी शैक्षणिक पात्रता स्वतंत्रपणे विहित करण्यात आली आहे. वयोमर्यादाही स्वतंत्रपणे ठरवण्यात आली आहे. अधिक शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा माहितीसाठी उमेदवार जारी केलेली भरती अधिसूचना तपासू शकतात. या सर्व पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांची निवड प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत आणि कागदपत्रांद्वारे केली जाईल.