भंडारा : जिल्हा परिषदेमधील जागांसाठी मेगा भरतीला सुरूवात झाली आहे. एकूण 34 जिल्हा परिषदांसाठी 19, 460 पदांसाठीची भरती होणार आहे. यातील भंडारा जिल्ह्यासाठी एकूण 320 जागांसाठी भरती होणार आहे. भंडारा जिल्हा परिषदेच्या भरतीसाठी प्रक्रिया शनिवारपासून सुरुवात झाली. भंडारा जिल्हा परिषदेत 320 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.
ऑनलाईन पद्धतीने 5 ऑगस्टपासून अर्ज करता येणार असून 25 ऑगस्ट ही अंतिम तारीख असणार आहे. या परीक्षेसाठीचे उमेदवारांचे प्रवेशपत्र परीक्षेच्या 7 दिवस आधी मिळणार आहे. या पराक्षेसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 18 ते 38 आणि मागासवर्गीय उमेदवारासांठी 18 ते 43 इतकी असणार आहे. तर दरमहा वेतन हे 19,900 ते 1,12,400 इतका असणार आहे.
अनुसूचित क्षेत्राबाहेरील (बिगर पेसा) सरळसेवेची रिक्त पदे पदभरतीसाठी संवर्गनिहाय घोषित पदे पुढील प्रमाणे आहेत.
आरोग्य पर्यवेक्षक 02, आरोग्य सेवक (पुरुष) 40% 22, आरोग्य सेवक (पुरुष) 50% 37, आरोग्य सेविका (महिला) 120, औषध निर्माण अधिकारी 04, कंञाटी ग्रामसेवक 33, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (बांधकाम / प्रा.पा.पू.विभाग) 31, कनिष्ठ लेखा अधिकारी 02, कनिष्ठ सहायक (लिपीक) 18, कनिष्ठ सहायक (लेखा) 07, पशुधन पर्यवेक्षक 05, घुलेखक (निम्न श्रेणी) 01, वरिष्ठ सहायक (लिपीक) ०4, वरिष्ठ सहायक (लेखा) 02, विस्तार अधिकारी (कृषि) 04, विस्तार अधिकारी (पंचायत) 02, विस्तार अधिकारी (सांख्यीकी) 04, स्थापत्य अभियांत्रीकी सहायक 17, आणि अंगणवाडी पर्यवेक्षीका 5
जिल्हा परिषदेतील भरती प्रक्रिया इंस्टीट्यूट ऑफ बँकिंग सिलेक्शन या संस्थेकडून राबण्यात येणार आहे. ही संस्था भरतीसाठी परीक्षा घेणार आहे. जिल्हा परिषदेतील विविध ३४ विभागांसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे. परीक्षेसाठी अभ्यासक्रमाचा पॅटर्न मात्र जिल्हा परिषदेने तयार केला आहे.