भारतीय रेल्वेत मोठी संधी, विशीच्या हात हमखास नोकरी, टाईमपास पुरे आता झटपट अर्ज करा

| Updated on: Mar 01, 2025 | 4:36 PM

RRB Group D Recruitment 2025 : भारतीय रेल्वेत जाण्यास अनेक मराठी तरूण नाक मुरडतात. पण इयत्ता 10 वी उत्तीर्ण झाल्यानंतर चांगली तयारी केल्यास तुम्हाला नोकरी मिळू शकते. त्यानंतर अभ्यास सुरू ठेवल्यास इतर पदासाठी तुम्ही पात्र ठरू शकता.

भारतीय रेल्वेत मोठी संधी, विशीच्या हात हमखास नोकरी, टाईमपास पुरे आता झटपट अर्ज करा
रेल्वेत नोकरी
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
Follow us on

भारतीय रेल्वेमध्ये नोकरीची संधी आहे. वयाच्या विशी अगोदर तुम्हाला नोकरीची संधी चालून आली आहे. इयत्ता 10 वी उत्तीर्ण झाले की, तुमची पहिली नोकरी पक्की आहे. अर्थात त्यासाठी अर्जफाटे आणि परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे आहे. रेल्वे भरती बोर्डाने (RRB) ग्रुप-डी 2025 पदासाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. देशातील लाखो तरुणांना सरकारी नोकरी प्राप्त करण्यासाठी चांगली संधी चालून आली आहे. ज्या उमेदवारांनी आतापर्यंत अर्ज केला नाही त्यांच्यासाठी अखेरची संधी आहे. कारण अगदी काही तासात अर्ज प्रक्रिया संपणार आहे. आता नोंदणी करून नंतर तुम्हाला त्यात बदल करता येईल. दुरुस्ती करता येईल.

त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी झटपट आवश्यक कागदपत्रांसह अर्ज प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. त्यामुळे त्यांना अखेरच्या टप्प्यात कोणतीही अडचण येणार नाही. या भरतीसाठी उमेदवारांना आरआरबीच्या अधिकृत साईटवर जाऊन अर्ज करावा लागेल. एकूण 32,438 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.

पुढील आठवड्यात करता येईल दुरुस्ती

हे सुद्धा वाचा

आरआरबी ग्रुप डी 2025, अर्ज नुमन्यात सुधारणा करण्यासाठी 4 ते 13 मार्च, 2025 पर्यंत कालावधी देण्यात येईल. पण उमेदवारांना खाते तयार करण्याचा अर्ज आणि निवडलेले रेल्वे विभाग यामध्ये सुधारणा करता येणार नाही.

शैक्षणिक योग्यता काय?

इयत्ता 10 वी उत्तीर्ण उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतो. आता या पदासाठी ITI ची पदविका, डिप्लोमा असणे गरजेचे नाही. या पदासाठी अर्ज करणाऱ्यांचे वय हे 18 ते 36 वर्ष (1 जानेवारी 2025 नुसार) या दरम्यान असावे. ओबीसी उमेदवारांसाठी वयात सवलत 3 वर्ष तर एससी/एसटीमधील उमेदवारांसाठी ही सवलत 5 वर्ष इतकी आहे.

किती द्यावे लागेल शुल्क

सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी 500 रुपये (CBT मधील उमेदवारांना 400 रुपये परत करण्यात येतील) इतके आहे. एससी/ एसटी/ महिला/ दिव्यांग/ ट्रांसजेंडर/ईबीसी श्रेणीतील लाभार्थ्यांना 250 रुपये शुल्क आहे. CBT मधील उमेदवारांना संपूर्ण रक्कम परत करण्यात येईल. लाखो तरुणांना सरकारी नोकरी प्राप्त करण्यासाठी चांगली संधी चालून आली आहे. ज्या उमेदवारांनी आतापर्यंत अर्ज केला नाही त्यांच्यासाठी अखेरची संधी आहे. कारण अगदी काही तासात अर्ज प्रक्रिया संपणार आहे.