BRO Recruitment 2021: बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनमध्ये 459 पदांवर भरती, 92 हजार रुपयांपर्यंत पगार

| Updated on: Apr 13, 2021 | 11:24 AM

BRO Recruitment 2021: बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनमध्ये (BRO) मध्ये 459 पदांवर भरती होणार असून अर्ज करण्यासाठी मुदत वाढवण्यात आली आहे.

BRO Recruitment 2021: बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनमध्ये 459 पदांवर भरती, 92 हजार रुपयांपर्यंत पगार
ministry of defence recruitment 2021
Follow us on

BRO Recruitment 2021 नवी दिल्ली: भारताच्या संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनमध्ये (BRO) मध्ये 459 पदांसाठी भरती आयोजित केली गेली आहे. या पदासांठी अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. पदभरतीचं नोटिफिकेशन 18 फेब्रुवारीला जाहीर झालं होतं. नोटिफिकेशन जाहीर झाल्यापासून 75 दिवसांपर्यंत अर्ज करता येणार आहे. ( BRO Recruitment 2021 Last Date Extended for 459 posts know full details)

बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या (Border Road organization) अधिकृत वेबसाईटवर पदभरतीबाबत विशेष माहिती दिली आहे. कार्टोग्राफर, स्टोअर सुपरवाइजर, रेडियो मेकॅनिक, लेबोरेटरी असिस्टंट, मल्टी-स्किल्ड वर्कर (Multi-Skilled Worker) आणि टेक्निकलच्या पदांचा समावेश आहे.

अर्ज कोण करु शकतं?

बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या जाहिरातीनुसार पदनिहाय अर्ज करण्यासाठी पात्रता वेगवेगळी आहे. यामध्ये मल्टी स्किल्ड वर्कर पदासाठी अर्ज करायचा असल्यास उमेदवार 10 वी उत्तीर्ण आणि संबंधित आयटीआय ट्रेड उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. ड्राफ्टमॅन पदासाठी ड्राफ्टमॅन ट्रेडसह बारावीच्या गुणांवर निवड केली जाणार आहे. अधिकृत माहितीसाठी उमेदवारांनी बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

कुठली पदं भरली जाणार?

बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनमध्ये (BRO Recruitment 2021) निवड झालेल्या उमेदवारांना 19,900 ते 92,300 पगार मिळणार आहे. ड्राफ्ट्समन 43 पद, पर्यवेक्षक 11, रेडियो मेकॅनिक 4, लॅब असिस्टंट 1, मल्टी स्किल्ड वर्कर (मेसन) 100 आणि मल्टी स्किल्ड वर्कर (ड्राइवर इंजन स्टेटिक) 150 पदांवर भरती केली जाणार आहे.

पगार किती मिळणार?

ड्राफ्ट्समन : 29,200-92,300 रुपये
पर्यवेक्षक : 25,500-81,100 रुपये
रेडियो मेकॅनिक : 25,500-81,100 रुपये
लॅब असिस्टंट: 21,700-69,100 रुपये
मल्टी स्किल्ड वर्कर (मेसन) : 18,000-56,900 रुपये
स्टोर कीपर : 19,900-63,200 रुपये

How to Apply अर्ज कसा करणार?

बीआरओमधील (BRO Recruitment 2021) पदांवर अर्ज करण्यासाठी उमेदवारांना bro.gov.in या वेबसाईटवरुन अर्ज डाऊनलोड करावा लागणार आहे. अर्ज भरुन जाहिरातीमध्ये दिलेल्या पत्यावर पाठवावा लागणार आहे. जे उमेदवार यामध्ये यशस्वी होतील त्यांना मुंबई किंवा पुणे येथे काम करावं लागणार आहे.

संबंधित बातम्या:

SSC Constable GD 2021 Notification : जीडी कॉन्स्टेबल भरतीसाठीचं नवं नोटिफिकेशन जाहीर, 10 वी पास असणाऱ्यांना मोठी संधी

Railway Recruitment 2021: ना परीक्षेची झंझट, ना मुलाखतीचं टेन्शन, दहावी पासना थेट रेल्वेत नोकरी

BRO Recruitment 2021 Last Date Extended for 459 posts know full details