Medical Officer vacancy 2021 मुंबई : वैद्यकीय क्षेत्रात सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झली आहे. महाराष्ट्र आरोग्य विभागाने वैद्यकीय अधिकारी पदावर(Medical Officer vacancy 2021) भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेनुसार राज्यात एकूण 899 वैद्यकीय अधिकारी भरती होणार आहेत. अर्जासाठी वेबसाइटवर लिंक सक्रिय करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने जारी केलेल्या भरतीसाठी(Medical Officer vacancy 2021) अर्ज करण्याची प्रक्रिया 31 मार्च 2021 पासून सुरू झाली आहे. यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 20 एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे. इच्छुक उमेदवार नियोजित वेळेपूर्वी या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करु शकतात. इच्छुक उमेदवार अधिकृत संकेतस्थळ arogya.maharashtra.gov.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. (Bumper Recruitment for Medical Officer Post in Maharashtra Health Department, Apply Early)
अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट arogya.maharashtra.gov.in वर जा.
येथे होम पेज वर Career सेक्शनमध्ये जा.
आता “Direct recruitment to the post of Medical Officer Maharashtra Medical and Health Services Group A for 899 post” लिंकवर क्लिक करा.
येथे अर्जाची पीडीएफ ओपन होईल.
ही पीडीएफ डाउनलोड करा आणि प्रिंट घ्या.
हा अर्ज भरुन “The Director, Health Services, Mumbai किंवा “द डायरेक्टर कमिश्नरेट ऑफ हेल्थ सर्विसेज, आरोग्य भवन सेंट जॉर्ज हॉस्पिटल, कंपाउंड मुंबई- 400001” च्या पत्त्यावर पोस्ट करा.
अर्जाची संपूर्ण माहिती अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे.
या पदांवर अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे एमबीबीएस किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची समकक्ष डिग्री असणे आवश्यक आहे. तसेच अर्जदाराचे वय 38 वर्षांपेक्षा जास्त असावे. वयाची गणना 1 एप्रिल 2001 च्या आधारावर केली जाईल. यात अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी अधिकृत अधिसूचना एकदा तपासून पहा.
यासाठी जनरल आणि ओबीसी प्रवर्गाच्या उमेदवारांना 1000 रुपये तर एससी, एसटी आणि एक्स-सर्व्हिसमन प्रवर्गातील उमेदवारांना 500 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. या पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना 56100 – 177500 रुपये पगार देण्यात येईल. (Bumper Recruitment for Medical Officer Post in Maharashtra Health Department, Apply Early)
बदलापूरचे जवान सुनील शिंदे लेहमध्ये शहीद!#badlapurjawanmartyr #sunilshindemartyrhttps://t.co/4VBdHoWUx7
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 6, 2021
इतर बातम्या
मोठी बातमी ! अनिल देशमुखांची विकेट घेणाऱ्या जयश्री पाटलांविरोधात तक्रार, नेमका आरोप काय?