मुंबई : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटन्ट्स ऑफ इंडीया (ICAI) ने सीए (CA) फाऊंडेशन कोर्ससाठी मे मधील परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. या परीक्षा 24,,26, 28, आणि 30 जून रोजी घेण्यात येतील. जे उमेदवार ही परीक्षा देणार आहेत, त्यांना ICAI च्या icai.org या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन अधिक माहिती मिळवता येईल.
आईसीएआई तर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या सीए फाउंडेशन परीक्षेसाठी अर्जभरण्याची प्रक्रिया 20 एप्रिलपासून सुरु होणार आहे. 20 अप्रिल ते 4 मे 2021 या कालावधीत उमेदवारांना अर्ज भरता येईल. इच्छुक उमेदवार ICAI च्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन अर्ज भरू शकतात. परीक्षेसाठी लागणारी फि ही डेबिट किंवा क्रेडीट कार्डद्वारे भरण्याचा ऑप्शन उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
आयसीएआयने प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकानुसार पेपर 1 आणि पेपर 2 ची परीक्षा दुपारी 2 ते संध्याकाळचे 5 या काळात आयोजित केली जाईल. तसेच पेपर 3 आणि पेपर 4 हे दुपारी 2 ते 4 या वेळेत घेतले जातील. पेपर 3 आणि पेपर 4 साठी प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी कोणताही आगावीचा वेळ दिला जाणार नाही. तर बाकीचे पेपर सोडवताना उमेदवारांना 15 मिनटं अगोदर प्रश्नपत्रिका दिली जाईल. या 15 मिनिटांमध्ये उमेदवारांना प्रश्नपत्रिका वाचता येईल. यासंदर्भात अधिक माहिती आयसीएआयच्या वेबासाईटवर देण्यात आली आहे.
ICAI ने इंटरमीडिएट आणि फायनल अभ्यासक्रमांसाठीसुद्धा परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. जाहीर तारखांनुसार इंटरमीडिएट आणि फायनल या अभ्यासक्रमांच्या परीक्षा 21 मे पासून सुरु होणार असून 6 जून 2021 रोजी संपतील. दुपारी 3 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ही परीक्षा होईल. फायनलमधील पेपर 6 हा दुपारी 3 ते संध्याकाळी 7 या कालाधीत होईल.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे 9 मार्च रोजीचा मनसेचा वर्धापनदिन सोहळा रद्द https://t.co/FMpwiZ2rLh @RajThackeray @mnsadhikrut @CMOMaharashtra @OfficeofUT #MNS #RajThackeray #VardhapanDin #MaharashtraNavnirmanSena
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 6, 2021
इतर बातम्या :
Recruitment 2021 : ‘या’ मोठ्या कंपनीत नोकरी करण्याची नामी संधी; अर्ज करण्यासाठी आज शेवटचा दिवस
IBPS CRP RRB IX Officer Result 2021 : ऑफिसर स्केल 2,3 साठी प्रोव्हिजनल यादी जारी, सविस्तर पाहा