नवी दिल्ली: सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स (CISF) ट्रेडसमन कॉन्स्टेबल परीक्षेचे अॅडमिट कार्ड जारी करण्यात आलं आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाची ट्रेडसमन (CISF Tradesman Constable Admit Card) परीक्षा 21 मार्चला होणार आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाकडून ट्रेडसमन परीक्षेचे अॅडमिट कार्ड जाहीर करण्यात आलं आहे. ट्रेडसमन परीक्षेसाठी ज्यांनी अर्ज केले असतील त्यांनी सीआयएसएफच्या वेबसाईटला भेट देऊन प्रवेशपत्र डाऊनलोड करता येईल. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या cisfrectt.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अॅडमिट कार्ड डाऊनलोड करता येईल. (CISF tradesman constable admit card 2021 released download here)
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाकडून लेखी परीक्षेद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. CISF ट्रेडसमन कॉन्स्टेबल परीक्षेसाठाी देशभरात परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. 21 मार्च रोजी देशातील 37 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा आयोजित केली जाईल. लेखी परीक्षेला सकाळी 8 वाजता सुरुवात होणार आहे. परीक्षेदरम्यान कोरोनाविषयक नियमांचं पालन करण्याविषयी सूचना देण्यात आल्या आहेत.
CISF ट्रेडसमन कॉन्स्टेबल भरती परीक्षेसाठी 19196 उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. उत्तर विभागात 4427, एनसीआर विभागात 2940, पश्चिम विभागात 1486, मध्य विभाग 1051, पूर्व विभागात 2792, दक्षिण विभागात 419 आणि दक्षिण पूर्व 1871 तर उत्तर पूर्व विभागातील 420 उमेदवार परीक्षा देणार आहेत.
परीक्षेचे स्वरुप
CISF ट्रेडसमन कॉन्स्टेबल भरती परीक्षा लेखी पद्धतीनं होणार आहे. ही परीक्षा 100 गुणांची असेल. हे प्रश्न बहुपर्यायी स्वरुपाची असेल. परीक्षेमध्ये सामान्यज्ञान, सामान्य गणित, तार्किक क्षमता याविषयांवरील प्रश्न विचारले जातील. उमेदवारांना ही परीक्षा देताना इंग्रजी आणि हिंदीविषयी सामान्यज्ञान असणं आवश्यक आहे. सदर परीक्षेची वेळ 2 तासांची असेल.
भविष्यात भारतात डिजिटल कर्मचार्यांना सर्वाधिक मागणी, अमेझॉनच्या अहवालात खुलासा
RBI Grade B Phase 1 Admit Card 2021: प्रिलिम परीक्षेचे हॉल तिकिट जारी, असे करा डाऊनलोड
(CISF tradesman constable admit card 2021 released download here)