GATE 2021 परीक्षेसाठी परीक्षा केंद्र बदलायचंय?; मग ‘ही’ माहिती जाणून घ्या

| Updated on: Dec 15, 2020 | 5:08 PM

GATE 2021 प्रवेश परीक्षा देऊ इच्छीणाऱ्या उमेदवारांना सोमवारपर्यंत (15 डिसेंबर) आपले परीक्षा केंद्र बदलता येणार आहेत. (gate exam center changing)

GATE 2021 परीक्षेसाठी परीक्षा केंद्र बदलायचंय?; मग ही माहिती जाणून घ्या
सीटीईटी परीक्षेची उत्तरपत्रिका प्रसिद्ध
Follow us on

मुंबई : GATE 2021 प्रवेश परीक्षा देऊ इच्छीणाऱ्या उमेदवारांना सोमवारपर्यंत (15 डिसेंबर) आपले परीक्षा केंद्र बदलता येणार आहेत. त्यासाठी GATE ऑनलाईन अ‌ॅप्लीकेशन प्रोसेशन सिस्टिमची (GOAPS) ऑफिशियल बेबसाईट gate.iitb.ac.in वर पर्याय उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. GATE ची परीक्षा 2021 साली फेब्रुवारी महिन्यात आयोजित केली जाईल. (detail procedure of gate exam center changing process)

आवडती विद्याशाखा तसेच नामांकित विद्यालयात प्रवेश मिळावा अशी इच्छा प्रत्येक विद्यार्थ्याची असते. त्यासाठी वेगवेगळ्या विद्याशाखांकडून प्रवेश परीक्षेचे आयोजन केले जाते. अभियांत्रिकी विद्याशाखेत पदव्यूत्तर शिक्षण घेण्यासाठी GATE ही प्रवेश परीक्षा आयोजित केली जाते. GATE 2021 ची परीक्षा देण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरलेले आहेत. मात्र, कोरोना महामारी आणी प्रवासाच्या अडचणीमुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र बदलायचे असेल तर प्रशासनाने तशी सुविधा केलेली आहे. विद्यार्थ्यांना त्यांचे परीक्षा केंद्र बदलता येणार आहेत. मंगळवार (15 डिसेंबर) पर्यंत विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र बदलता येणार आहेत. ही सुविधा 28 ऑक्टोबरपासून सुरु होती. (detail procedure of gate exam center changing process)

इंजिनअरिंग, टेक्नॉलॉजी, आर्किटेक्चर या विद्याशाखेत पदव्यूत्तर पदवीचे शिक्षण घेण्यासाठी ग्रॅज्यूएट अॅप्टीट्यूड टेस्ट ईन इंजिनिअरिंग म्हणजेच GATE  या परिक्षेचे आयोजन केले जाते. या वर्षी ही परीक्षा 27 विविध विषयांसाठी होणार आहे. परीक्षेचे सर्व वेळापत्रक gate.iitb.ac.in या संकेतस्थळावर देण्यात आलेले आहे.

परीक्षा केंद्र कसे बदलावे?

GATE परीक्षाकेंद्र बदलण्यासाठी उमेदवारांना संकेतस्थळावर केंद्र निवडीचा पर्याय देण्यात आलेला आहे. परीक्षा केंद्र बदलण्यासाठी अ‌ॅप्लीकेशन फॉर्म करेक्शन या विंडोवर क्लिक करावे. त्यानंतर उमेदवाराचा रजिस्ट्रेशन नंबर आणि जन्मतारीख यांच्या मदतीने त्यांनी स्वत:चे लॉगिन करावे. त्यानंतर उमेदवार हव्या त्या परीक्षा केंद्रावर क्लिक करुन आपल्या आवडीच्या ठिकाणी परीक्षा देऊ शकतात. (detail procedure of gate exam center changing process)

GATE प्रवेश परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होईल. ही परीक्षा कंप्यूटर बेस्ड असेल. या परीक्षेत एकूण 100 प्रश्न असतील. सर्व प्रश्न मल्टीपल चॉईस असतील. एकूण तीन तासांत विद्यार्थ्यांना 100 प्रश्न सोडवावे लागतील.

संबंधित बातम्या :

चंद्रकांत पाटलांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा; भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी

नाशिक पालिका निवडणुकांसाठी शिवसेनेची रणनीती, राऊतांचा विश्वासू नेता महानगरप्रमुख

LIVE UPDATES : वर्षा बंगल्याचा एक रुपयाही थकीत बिल नाही : अजित पवार

(detail procedure of gate exam center changing process)