कर्मचारी राज्य विमा निगम म्हणजे ईएसआयसीने विविध पदांसाठी भरती काढली आहे. त्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि योग्य उमेदवार ईएसआयसीच्या esic.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन भरतीचं नोटिफिकेशन पाहू शकतात. उमेदवारांनी 22 जानेवारी 2025 पर्यंत अर्ज भरायचे आहेत. या भरती अभियानाच्या अंतर्गत ईएसआयसीमध्ये स्पेशलिस्ट (विशेषज्ञ)चे एकूण 3 पद भरली जाणार आहेत.
ESIC Recruitment 2025 Vacancy Details : रिक्तपदांची माहिती
फुल टाइम स्पेशलिस्ट (रेडियोलॉजी)- 2 पद (अनारक्षित आणिएससी कॅटेगरीसाठी प्रत्येकी 1-1 पद)
पार्ट टाइम स्पेशलिस्ट (ऑप्थेल्मोलॉजी)- 1 पद (ओबीसीसाठी आरक्षित)
ESIC Recruitment 2025 Eligibility Criteria : पात्रतेचे निकष काय?
शैक्षणिक पात्रता –
कर्मचारी राज्य विमान निगममध्ये निघालेल्या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे संबंधित क्षेत्रातील मान्यत प्राप्त डिप्लोमा वा एमबीबीएसची डिग्री असली पाहिजे. तसेच पीजी डिग्री मिळवल्यानंतर तीन वर्षाचा अनुभव किंवा पदवी किंवा डिप्लोमा घेतल्यानंतर कमीत कमी पाच वर्षाचा अनुभव असला पाहिजे.
वयोमर्यादा –
या पदावर अर्ज करणअयासाठी उमेदवाराचं वय मुलाखतीच्या वेळेपर्यंत 67 वर्षाहून अधिक असता कामा नये. मात्र, नियमानुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.
ESIC Recruitment 2025 Apply Process: अर्ज कसा करावा?
इच्छुक उमेदवारांना ईएसआयसीमध्ये अर्ज करायचा असेल तर ईएसआयसीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन दिलेल्या फॉरमॅटनुसार अर्ज करावा. मुलाखतीत भाग घेण्यासाठी उमेदवारांनी त्यांच्या अर्जाची एक प्रत खाली दिलेल्या कागदपत्रांसह घेऊन यावी.
दोन पासपोर्ट साइज फोटो
जन्म दाखल्याचा पुरावा (एसएसएलसी/मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेट आदी)
शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र (एमबीबीएस, डिप्लोमा/डिग्री)
संबंधित मेडिकल कौन्सिलचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट
जात प्रमाणपत्र
अनुभवाचं प्रमाणपत्र
ESIC Recruitment 2025 Selection Process: निवड कशी होते?
वाक् इन इंटरव्ह्यूद्वारे उमेदवारांची निवड होणार आहे. निवड प्रक्रियेत भाग घेण्यासाठी उमेदवारांना निर्धारित तारीख आणि वेळेला इंटरव्ह्यूच्या ठिकाणी यायचं आहे.
इंटरव्यूचे ठिकाण : मेडिकल सुपरिटेंडेंटचे ऑफिस, ईएसआईसी रुग्णालय, वन्नारपेट्टई, तिरुनेलवेली
तारीख : 22 जानेवारी 2025
वेळ : सकाळी 9:00 वाजल्यापासून 10:30 पर्यंत
ESIC Specialist Salary: पगार किती मिळणार?
नोटिफिकेशननुसार, फुल टाइम स्पेशलिस्ट (रेडियोलॉजी) पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला महिन्याला 1,31,067 रुपये पगार देण्यात येणार आहे. तर, पार्ट टाइम स्पेशलिस्ट (ऑप्थेल्मोलॉजी) पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला प्रत्येक आठवड्याला 16 तासाहून अधिक काम केल्यावर तासाला 800 रुपयांसह महिन्याला 60 हजार रुपये पगार दिला जाणार आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी कर्मचारी राज्य विमान निगमच्या अधिकृत वेबसाईट esic.gov.in वर जाऊन भेट द्यावी.