नवी दिल्ली: सरकारी नोकरी (Government Job) मिळवण्यासाठी तयारी करणाऱ्या युवकांसाठी महत्वाची बातमी आहे. जनरल इन्शुरन्स कार्पोरेशन ऑफ इंडियामध्ये स्केल 1 च्या ऑफिसर (असिस्टंट मॅनेजर) पदासाठी भरती सुरु आहे. जीआयसीमध्ये एकूण 44 पदांवर भरती होणार आहे. जीआयसीमधील पदांसाठी अर्ज करायचा असल्यास जीआयसीच्या वेबसाईटवर भेट देऊन ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करावा. जनरल इन्शुरन्स कार्पोरेशन ऑफ इंडियामधील ऑफिसर या पदासाठीची अर्ज भरण्याची पक्रिया 11 मार्चपासून सुरु होणार आहे. तर या पदासाठी अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 29 मार्च आहे. अधिक माहितीसाठी जीआयसीच्या वेबसाईटला भेट देणं गरजेचे आहे. (GIC recruitment 2021 for Assistant Manager post know full details)
जनरल बिमा निगम लिमिटेड म्हणजेत जीआयसीच्या नोटीफिकेशननुसार मान्यताप्राप्त विद्यापीठ आणि इतर उच्च शिक्षणंसस्थामधून पदवीधर होणं आवश्यक आहे. जीआयसीमधील ऑफिसर पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारानं पदवी परीक्षेत 60 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवलेले असणं आवश्यक आहे. तर, राखीव प्रवर्गातील एससी आणि एसटीमधील उमेदवारांसाठी गुणांची अट 55 टक्के ठेवण्यात आली आहे. ऑफिसर पदासाठी 65 हजार रुपये पगार देण्यात येणार आहे.
वयोमर्यादा
ऑफिसर या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांचं वय 21 ते 30 दरम्यान असणं आवश्यक आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. वयोमर्यादेसाठी 1 फेब्रुवारी 2021 ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. जीआयसी भरतीबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटला भेट देऊन माहिती घेणं गरजेचे आहे.
जीआईसीच्या नोटीफिकेशननुसार निवड प्रक्रिया लेखी परीक्षा, गटचर्चा आणि मुलाखतीमध्ये मिळवलेल्या गुणांच्या आधारावर होईल. लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना गटचर्चा आणि मुलाखतीला बोलावले जाईल.यामधील गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल.
शेतकऱ्यांना सक्षम बनवणारं ठाकरे सरकारचं विकेल ते पिकेल अभियान नेमक काय? वाचा सविस्तरhttps://t.co/zsFfExy2bL#UddhavThackeray | #Dadabhuse | #Shivsena | #AjitPawar | #Farmstories |@ShivSena | @INCMaharashtra | @NCPspeaks
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 8, 2021
संबंधित बातम्या:
Job Alert | ग्रामीण विकास मंत्रालयात विविध पदांची भरती, अर्ज करण्यासाठी उरले काही तास
(GIC recruitment 2021 for Assistant Manager post know full details)