मुंबई : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत (इस्रो) काम करण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. पण तिथे कसं पोहोचणार? त्यासाठी काय करावं लागतं? असे बरेचशे प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. पण जर तुम्हाला खरंच इस्रोमध्ये नोकरी करायची इच्छा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. इस्रोमध्ये टेक्निकल असिस्टेंट, टेक्निशियन बी, ड्रट्समॅन, हेवी व्हेइकल ड्रायव्हर ए, लाइट व्हेइकल ड्रायव्हर ए आणि फायरमन या पदांसाठी भरती केली जाणार आहे. इच्छुक उमेदवार ऑनलाईन अर्ज दाखल करू शकतात. या पदांसाठी तुम्ही अधिकृत वेबसाईटवर 24 एप्रिल 2023 पर्यंत अर्ज करू शकता. इस्रोने यासाठी एक अधिसूचना जारी केली आहे.
इस्रोमध्ये 63 पदांची भरती केली जाणार आहे. यात टेक्निशयनसाठी 30, टेक्निशियन असिस्टेंटसाठी 24 आणि अन्य पदांसाठी 9 जणांची भरती केली जाणार आहे.
टेक्निशियन पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार 10 वी पास आणि फिटर ट्रेडमध्ये आयटीआय पास असणं गरजेचं आहे. टेक्निकल असिस्टेंट पदासाठी मॅकेनिकल इंजिनिअर किंवा प्रोडक्शनमध्ये डिप्लोमाधारक असावा. अर्ज करणाऱ्या उमेदवारीचं वय 35 वर्षे असावं.
ही फी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने भरू शकता.या व्यतिरिक्त क्रेडिट, डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंगच्या माध्यमातून भरू शकता.
इस्रोमध्ये उमेदवारांची निवड लिखित परीक्षेच्या आधारे होईल. ही परीक्षा कंप्युटर बेस्ड टेस्ट फॉर्मेटमध्ये असेल. परीक्षेसाठी देशातील विविध शहरांमध्ये अर्ज करता येईल.https://www.iprc.gov.in/iprc/careers.html या लिंकवरून तुम्ही थेट माहिती घेऊ शकता.