Logo Contest | सरकारचे ‘एक’ काम करा नि हजारो रुपये जिंकण्याची संधी मिळावा!

| Updated on: Jan 21, 2021 | 2:14 PM

आपल्याला जर लोगो डिझायनिंगचा छंद असेल, तर आपण भारत सरकार नव्या स्पर्धेत भाग घेऊ शकता.

Logo Contest | सरकारचे ‘एक’ काम करा नि हजारो रुपये जिंकण्याची संधी मिळावा!
Follow us on

मुंबई : आपल्याला जर लोगो डिझायनिंगचा छंद असेल, तर आपण भारत सरकार नव्या स्पर्धेत भाग घेऊ शकता. या स्पर्धेत जिंकणाऱ्याला हजारो रुपयांचे रोख बक्षीस दिले जाणार आहे. ही स्पर्धा खास त्यांच्यासाठी आहे, ज्यांना डिझाईन करण्याचा छंद आहे आणि ते कोणत्याही एका कंपनीसाठी लोगो तयार करू शकतात. जर, आपण देखील एखाद्या कंपनीसाठी लोगो तयार करू शकत असाल, तर आपल्यासाठी ही चांगली संधी आहे. यातून आपल्याला चांगले पैसेही मिळतील आणि स्वतःची एक ओळख देखील मिळेल (Government contest for logo design know about applying process).

केमिकल्स अँड फर्टीलायजर्स मंत्रालयाने Pharmaceuticals & Medical Devices Bureau of India साठी लोगो डिझाईन करण्यास सांगितले आहे. जर, सरकारला हे डिझाईन आवडले, तर आपणास बक्षीस मिळेल आणि तुमचा लोगो भारत सरकारच्या युनिटचे ‘ओळख चिन्ह’ अर्थात ‘लोगो’ असेल. पूर्वी त्याचे नाव ‘ब्युरो ऑफ फार्मा पीएसयू ऑफ इंडिया’ असे होते. परंतु, आता त्याचे नाव बदलण्यात आले आहे. म्हणूनच आता त्याचा लोगो तयार करावा लागणार आहे. त्यासाठी वेगवेगळ्या लोकांकडून एंट्री मागवण्यात आल्या आहेत.

बक्षीस म्हणून मिळेल ‘इतकी’ रक्कम!

जर, आपण तयार केलेल्या लोगोची निवड सरकारने केली असेल, तर तुम्हाला दहा हजार रुपयांचे रोख बक्षीस दिले जाईल. या स्पर्धेसाठी आपण 22 जानेवारीपर्यंत अर्ज करू शकता.

एंट्री पाठवताना ‘या’ गोष्टी लक्षात घेणे आवश्यक…

– सर्व एंट्री www.mygov.in वर सादर करायच्या आहेत. या व्यतिरिक्त, कोणत्याही मोडद्वारे एंट्री स्वीकारली जाणार नाही.

– एकदा विजेता घोषित झाल्यावर, विजेत्यास लोगोवर अधिकार सांगता येणार नाही.

– हा लोगो तयार करताना या उपक्रमाचा संदेश लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, याची खास काळजी घ्यावी.

– लोगो पूर्णपणे डिझाईन केलेला असावा आणि या लोकांच्या रचनेत कॉपीराईट अॅक्ट 1957चे उल्लंघन होऊ नये (Government contest for logo design know about applying process).

– ज्या व्यक्तीने लोगो डिझाईन केला असेल, त्या व्यक्तीस या स्पर्धेत भाग घ्यावा लागेल.

– जर, कोणतीही व्यक्ती कॉपीराइट कायद्याचे उल्लंघन करत असेल, तर त्यास तो स्वतः जबाबदार असेल आणि त्याची नोंद नाकारली जाईल.

– शेवटच्या तारखेपूर्वी हा फॉर्म लोकांसमोर सादर केला नाही तर बीपीपीआयची कोणतीही जबाबदारी असणार नाही.

– एक व्यक्ती केवळ एका लोगोसह अर्ज करू शकते. एका व्यक्तीकडून एकापेक्षा जास्त एंट्री स्वीकारली जाणार नाही.

– कोणतीही टीम देखील यासाठी अर्ज करू शकते.

– लोकांना प्रवेशासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही आणि लोक यासाठी विनामूल्य नोंदी पाठवू शकतात.

(Government contest for logo design know about applying process)

अर्ज कसा कराल?

लोगो आणि नावाची रचना तयार केल्यानंतर, आपल्याला अधिकृत वेबसाईटवर जाऊन प्रवेश फॉर्म भरावा लागेल. या वेबसाईटवर आपल्याला आपल्या लोगो आणि नावा वैगरेची माहिती द्यावी लागेल. जर, आपला लोगो निवडला तर, आपल्याशी संपर्क साधला जाईल.

‘या’ स्पर्धेसाठीही प्रवेश

या स्पर्धेमध्ये घरगुती उद्योग करणाऱ्या एसएचजी ग्रुपसाठी लोकांना लोगो आणि ब्रँड नेम तयार करण्यास सांगण्यात आले आहे. जर सरकारला तुमचा लोगो आवडला, तर तुम्हाला या लोगोच्या डिझाईनसाठी 50 हजार रुपये देखील मिळतील. सरकारने या गटांच्या उत्पादनास प्रोत्साहन देण्यासाठी, लोकांना त्याचा लोगो आणि ब्रँड नेम सुचवण्यास सांगण्यात आले आहे. एसएचजी ग्रुपच्या उत्पादनासाठी ‘ब्रँड नेम विथ लोगो’ द्यावे लागेल. या लोगोत महिला सबलीकरणाची भावना दाखवली गेली पाहिजे.

या लोगोने किंवा नावाने कोणत्याही धार्मिक भावना दुखावल्या जाऊ नयेत. हे नाव हिंदी किंवा संस्कृत भाषेतही  असू शकते. हे नाव एक शब्द देखील असू शकते. तसेच, लोगो डिझाईनमध्ये महिला सक्षमीकरणाची चर्चा असायला हवी आणि लोगो थोडासा वेगळा असावा. लोगो डिझाईन करण्यास इच्छुक उमेदवार, या स्पर्धेसाठी 31 जानेवारी 2021पर्यंत अर्ज करू शकतात.

(Government contest for logo design know about applying process)