Government Job: सरकारच्या या विभागात नोकरीची संधी, वय मर्यादा 35 वर्ष, पगार 1 लाख 50 हजार

| Updated on: Feb 12, 2023 | 2:26 PM

अर्जाची प्रक्रिया 17 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून अर्ज भरण्याची अंतिम तारीख 17 मार्च आहे. इच्छुक उमेदवार www.opsc.gov.in वर ऑनलाइन अर्ज करू शकतील.

Government Job: सरकारच्या या विभागात नोकरीची संधी, वय मर्यादा 35 वर्ष, पगार 1 लाख 50 हजार
Job recruitment
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई, जे लोकं सरकारी नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी आम्ही एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत. ओडिशा लोकसेवा आयोग ओडिशा न्यायिक सेवेतील दिवाणी न्यायाधीश पदासाठी अर्ज प्रक्रिया सुरू करणार आहे (Government job). अर्जाची प्रक्रिया 17 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून अर्ज भरण्याची अंतिम तारीख 17 मार्च आहे. इच्छुक उमेदवार www.opsc.gov.in वर ऑनलाइन अर्ज करू शकतील.

OPSC भरती 2023 रिक्त जागा तपशील: ही भरती मोहीम दिवाणी न्यायाधीशांच्या 57 रिक्त पदे भरण्यासाठी आयोजित केली जात आहे.

OPSC भरती 2023 वयोमर्यादा: वयोमर्यादेबद्दल बोलायचे झाल्यास, उमेदवारांचे वय किमान 23 वर्षे असावे. आणि कमाल वयोमर्यादा 35 वर्षे आहे.

हे सुद्धा वाचा

OPSC भरती 2023 निवड प्रक्रिया: या पदांसाठी उमेदवारांची निवड अनेक टप्प्यातील परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर केली जाईल. प्रथम पूर्व परीक्षा, नंतर मुख्य आणि शेवटी मुलाखत फेरी होईल. एक टप्पा पूर्ण करणाऱ्या उमेदवारालाच पुढील टप्प्यासाठी उपस्थित राहण्याची संधी मिळेल. तिन्ही टप्पे पार केल्यानंतरच तुम्हाला नियुक्ती मिळेल.

किती पगार मिळेल

या पदांवर निवड झाल्यानंतर, उमेदवारांना दरमहा 1.36 लाख रुपयांपर्यंत पगार मिळेल.

OPSC भर्ती 2023 शैक्षणिक पात्रता: उमेदवार मान्यताप्राप्त महाविद्यालय किंवा संस्थेतून कायदा पदवीधर असणे आवश्यक आहे.

OPSC भर्ती 2023: अर्ज कसा करायचा ते जाणून घ्या

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी प्रथम अधिकृत वेबसाइट opsc.gov.in वर जाणे आवश्यक आहे.

वेबसाइटच्या होमपेजवर तुम्हाला Apply online ची लिंक मिळेल, त्यावर क्लिक करा.

आता तुम्हाला येथे नोंदणी करावी लागेल. येथे मागितलेली सर्व आवश्यक माहिती आणि कागदपत्रे अपलोड केल्यानंतर, तुमचा फॉर्म सबमिट करा.

सबमिट केल्यानंतर, फॉर्मची प्रिंट आउट घ्या.

या पदांसाठी अर्ज करण्याची थेट लिंक https://www.opsc.gov.in/Public/OPSC/Default.aspx आहे.