नवी दिल्ली | 09 ऑगस्ट 2023 : तरुणांसाठी भारतीय रेल्वेत नोकरीची(Indian Railway Jobs) मोठी संधी उपलब्ध होत आहे. राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना रेल्वेत मोठ्या प्रमाणावर भरती होणार असल्याचे सांगण्यात आले. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यासंबंधीची माहिती दिली. त्यानुसार, रेल्वेच्या सर्वच विभागात सर्वच पदासाठी भरती प्रक्रिया होणार आहे. भारतीय रेल्वेने पण भरती होणार असल्याचे सांगितले. सेफ्टी स्टॉफ, असिस्टंट स्टेशन मास्टर, नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगिरी, तिकीट कलेक्टर अशा पदासाठी लवकरच भरती होईल. त्यासाठी लवकरच रेल्वेने भरतीसाठी तयार केलेल्या संकेतस्थळावर सूचना देण्यात येणार आहे.
इतके पदे रिक्त
भारतीय रेल्वेच्या सर्वच विभागात ग्रृप सी अंतर्गत 2,48,895 पद रिक्त आहेत. तर गृप ए आणि बी ची एकूण 2,070 पद रिक्त आहेत. रेल्वे विभागाच्या माहितीनुसार, एकूण 2.4 लाख पदांसाठी लवकरच भरती प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. सेफ्टी स्टॉफ, असिस्टंट स्टेशन मास्टर, नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगिरी, तिकीट कलेक्टर अशा पदासाठी भरती होईल. या पदांना दोन मुख्य गटात विभाजीत करण्यात आले आहे. यामध्ये गॅझेटेड ग्रुप ‘ए’ आणि ‘बी’ पदांचा समावेश आहे. तर नॉन-गॅझिटेड पदांमध्ये ग्रुप ‘सी’ आणि ‘डी’ या पदांचा समावेश आहे.
या कॅटेगिरीसाठी काय हवी अर्हता
या पदासाठी असा करा अर्ज