Engineer Vacancy 2021: इंजिनिअर्ससाठी मोठी संधी, HPCL मध्ये 200 पदांवर भरती, 1.6 लाख पगार मिळणार

| Updated on: Mar 18, 2021 | 11:33 AM

हिंदुस्थान पेट्रोलियमनं इंजिनिअरिंगच्या 200 जागासांठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. HPCL Recruitment Engineer Vacancy

Engineer Vacancy 2021: इंजिनिअर्ससाठी मोठी संधी, HPCL मध्ये 200 पदांवर भरती, 1.6 लाख पगार मिळणार
हिंदुस्थान पेट्रोलियम
Follow us on

Engineer Vacancy 2021 मुंबई : हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडनं (HPCL )इंजिनिअर पदाच्या भरतीसाठी नोटिफिकेशन जाहीर केले आहे. एकूण 200 पदांवर उमेदवारांची भरती केली जाणार आहे. इंजिनिअरची नोकरी शोधणाऱ्या युवकांसाठी ही मोठी संधी आहे. हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडनं 3 मार्चला नोटिफिकेशन जारी केले असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 एप्रिल आहे. निवड होणाऱ्या उमेदवारांना 1 लाख 60 हजार रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे. (HPCL recruitment 2021 engineer vacancy check details how to apply)

अर्ज कुठे करणार?

इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलेल्या उमेदवारांसाठी हिंदुस्थान पेट्रोलियममधील भरती ही मोठी संधी आहे. अर्ज करण्यास इच्छूक असणाऱ्या उमेदवारांनी ऑफिशियल वेबसाईट hindustanpetroleum.com ला भेट देण्याची आवश्यकता आहे. 15 एप्रिल 2021 पर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. अर्ज करण्याची मुदत संपल्यानंतर लिंक वेबसाईटवरुन हटवली जाणार आहे.

पदांची माहिती

हिंदुस्थान पेट्रोलियमनं इंजिनिअरिंगच्या 200 जागासांठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. त्यामध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी 120, सिव्हील इंजिनिअरसाठी 30, इलेक्ट्रिकल इंजिनिअर 25 आणि इंन्स्ट्रूमेंटेशन इंजिनिअरसाठी 25 जागा आहेत. उमेदवारांनी अधिक माहितीसाठी एचपीसीएलच्या वेबसाईटला अधिक माहितीसाठी भेट द्यावी.

अर्ज कसा करायचा?

  1. हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) च्या वेबसाईटवर जावा.
  2. होम पेजवर Career सेक्शनमध्ये जावा.
  3. तिथे View Available Positions या लिंक पर क्लिक करा.
  4. तिथे Our Current Openings वर जावा.
  5. पुढे Engineering Roles च्या समोरील ‘Click here to apply” लिंक वर क्लिक करा.
  6. यानंतर रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करा, अर्जाची फी भरुन संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करा.

अर्ज कोण करु शकते?

मेकॅनिकल इंजिनिअर, सिव्हील इंजिनिअर, इलेक्ट्रिकल इंजिनिअर आणि इंन्स्ट्रूमेंटेशन इंजिनिअर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची डिग्री असणं आवश्यक आहे.एसी, एसटी आणि दिव्यांग प्रवर्गातील उमेदवार सोडून इतरांना अर्जाचे शुल्क म्हणून 1000 आणि जीएसटीचे 180 असे एकूण 1180 रुपये फी भरावी लागणार आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

संबंधित बातम्या:

SBI Job : फक्त एक परीक्षा आणि मोठ्या पगाराची नोकरी, SBI मध्ये जॉबची सुवर्णसंधी

Job Vacancy : महाराष्ट्र मेट्रोमध्ये टेक्निशिअन, इंजिनिअरसह अनेक पदांवर भरती, 1.25 लाखांपर्यंत असेल पगार

(HPCL recruitment 2021 engineer vacancy check details how to apply)