नवी दिल्ली : दरवर्षी देशातील लाखो तरुण यूपीएससी परीक्षेला देतात. मात्र, यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेसची परीक्षा पहिल्याच प्रयत्नात पास करणे म्हणजे महा कठिण काम. अनेक वर्षांच्या प्रयत्नानंतर अनेक जण ही परीक्षा उत्तीर्ण होतात. परीक्षेत यश मिळवण्यासाठी उमेद्वार दिवस रात्र अभ्यास करतात. अनेक प्रकारचे कोचिंग क्लासेसही लावतात. मात्र, उत्तराखंडमधील एक चहा विक्रेता तरुण IAS ऑफीसर झाला आहे. कोणत्याही कोचिंग क्लास शिवाय या तरुणाने सलग 3 वेळा UPSC परीक्षा क्रॅक(cracked UPSC exam) केली आहे. हिमांशू गुप्ता (IAS Himanshu Gupta) असे या तरुणाचे नाव आहे. या तरुणाच्या अथक परिश्रमाचे आणि मेहनतीचे देशभरात कौतुक होत आहे.
हिमांशू याने UPSC परीक्षा पहिल्याच प्रयत्नात मेहनत आणि समर्पणाने पास केली. पहिल्याच प्रयत्ना PSC उत्तीर्ण करण्यासोबतच त्याने सलग तीन वेळा UPSC उत्तीर्ण करण्याचा विक्रमही रचला आहे. 2020 मध्ये ऑल इंडिया रँकीवर हिमांशू 139 स्थानावर होता.
UPSC सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे. सलग तीन वेळा ही परीक्षा उत्तीर्ण होत हिमांशूने एक विक्रम रचला आहे. हिमांशू मूळचा उत्तराखंडमधील सितारगंज जिल्ह्यातील आहे. तो अतिशय साध्या आणि गरीब कुटुंबातील आहे. त्याच्या वडीलांचे चहाचे दुकान आहे. हिमांशू रोज सकाळी वडिलांच्या दुकानात जायचा आणि तिथे बसून वर्तमानपत्र वाचत असे. वर्तमानपत्र वाचत असतानाच त्याने यूपीएससी परीक्षेची तयारी करण्याचा निर्णय घेतला.
चहा विकण्याच्या व्यवसायात वडिलांना मदत करत हिमांशूने अभ्यास केला. फक्त बेसिक इंग्रजी शिकण्यासाठी हिमांशू दररोज 70 किलोमीटरचा प्रवास करायचा.
शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर हिमांशूने दिल्ली विद्यापीठाच्या हिंदू कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. कॉलेजची फी भरण्यासाठी हिमांशू प्रायव्हेट कोचींग क्लासेसही घेत होता.
हिमांशूने यूपीएससीच्या तयारीसाठी कोचिंगची मदत घेतली नाही. हिमांशूने 2018 साली पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण केली. रँकनुसार, त्याला भारतीय रेल्वेत नोकरीची संधी मिळाली. यानंतर, 2019 मध्ये, त्याने UPSC उत्तीर्ण केले आणि पोलिस सेवेत रुजू झाला. 2020 मध्ये हिमांशूने तिसऱ्यांदा UPSC परीक्षा दिली. यावेळी त्याला 139 वा क्रमांक मिळाला. तिसर्यांदा परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्याने आयएएस होण्याचे स्वप्न पूर्ण केले. कोचींग क्लासेस लावले नसल्यामुळे हिमांशूने यूपीएससीच्या तयारीसाठी इंटरनेटची मदत घेतली आणि डिजिटल पद्धतीने मॉक टेस्ट दिल्या.