ICAI CA Exams Postponed: आयसीएआयनं 21 मेपासून सुरु होणाऱ्या सीएच्या परीक्षा लांबणीवर टाकल्या, पुन्हा परीक्षा कधी?

| Updated on: Apr 27, 2021 | 7:22 PM

आयसीएआयनं सीएच्या 21 मे पासून सुरु होणाऱ्या परीक्षा लांबणीवर टाकल्या आहेत. ICAI CA Exam Postponed

ICAI CA Exams Postponed: आयसीएआयनं 21 मेपासून सुरु होणाऱ्या सीएच्या परीक्षा लांबणीवर टाकल्या, पुन्हा परीक्षा कधी?
ICAI CA
Follow us on

ICAI CA Exam Postponed: 2021 नवी दिल्ली: इन्स्टिट्यूटऑफ चार्टड अकाउँटंट ऑफ इंडियानं (ICAI) सीए फायनल आणि इंटरमिजीएटच्या 21 मे पासून सुरु होणाऱ्या परीक्षा लांबणीवर टाकल्या आहेत. कोरोना विषाणू संसर्गाची परिस्थिती आणि विद्यार्थ्यांची सुरक्षा पाहून हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आयसीएआयनं दिली आहे. आयसीएआयनं याबाबत ट्विट केलं आहे. 21 मे पासून सीए फायनल आणि इंटरमिजीएटची परीक्षा सुरु होणार होती. (ICAI CA exam postponed Final and Intermediate which commenced from 21st May)

आयसीएआयचं ट्विट

आयसीएआयनं ट्विटमध्ये काय म्हटलं?

सीए फायनल आणि इंटरमिजीएटच्या परीक्षा लांबणीवर टाकल्याची माहिती ट्विटद्वारे दिली. कोरोना विषाणू संसर्ग आणि विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेऊन 21 आणि 22 मेपासून सुरु होणारी फायनल आणि इंटरची परीक्षा लांबवणीवर टाकली आहे. विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी 25 दिवसांचा वेळ मिळेल, अशा पद्धतीनं परीक्षेची तारीख जाहीर करण्यात येईल, अशी माहिती आयसीएआयनं दिली आहे.

परीक्षा स्थगित करण्याची विद्यार्थ्यांची मागणी

कोरोना विषाणू संसर्गाची परिस्थिती पाहता विद्यार्थी ट्विटरवर परीक्षा रद्द करण्याची मागणी करत होते. विद्यार्थ्यांच्या या मागणीची दखल घेत टीव्ही 9 नेटवर्कनं विद्यार्थ्यांच्या मागणीला प्रसिद्धी दिली होती.

जून महिन्यातील सीए फाऊंडेशनसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु

जून सत्रातील सीए फाऊंडेशन नोंदणीसाठीची अंतिम तारीख 4 मे आहे. विलंब शुल्कासहीत अर्ज करण्याची शेवटची मुदत 7 मे पर्यंत आहे. ज्या विद्यार्थ्यांना नोंदणी करायची आहे ते icaiexam.icai.org वेबसाईटवर भेट देऊन अर्ज करु शकतात. भारतातील विद्यार्थ्यांसाठी परीक्षेचे शुल्क 1500 रुपये तर परदेशी विद्यार्थ्यांसाठी 325 अमेरिकनं डॉलर इतकं शुल्क राहील.

संबंधित बातम्या:

CA Foundation June Exam 2021: आयसीएआयचा मोठा निर्णय, सीए फाऊंडेशन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा

SBI clerk job notification 2021: स्टेट बँकेत 5 हजार जागांवर बंपर भरती, 49 हजारांपर्यंत पगार

(ICAI CA exam postponed Final and Intermediate which commenced from 21st May)