ICAI CA Foundation June Exam 2021 नवी दिल्ली: इन्स्टिट्यूटऑफ चार्टड अकाउँटंट ऑफ इंडियानं (ICAI) सीए फाऊंडेशन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. जून परीक्षेसाठी नोंदणी अर्ज भरताना विद्यार्थ्यांना सीए मेंबर, गॅझेटेड ऑफिसर आणि शिक्षण संस्थाचे प्रमुख यांच्याकडून अर्ज साक्षांकन करण्याबाबत सूट देण्याचा निर्णय घेतलाय.(ICAI CA Foundation June exam 2021 registration process icai gave some relief to students check here )
आयसीएआयनं विद्यार्थ्यांना सीए मेंबर, राजपत्रित अधिकारी आणि शिक्षण संस्थांचे प्रमुख यांच्याकडून परीक्षा अर्ज साक्षांकित करुन घेण्यामध्ये सवलत दिली आहे. काही विद्यार्थ्याचे फोटो आणि सही अपलोड केलेले नसतील तर त्यांना जून महिन्यातील फाऊंडेशन परीक्षेची नोंदणी करताना परीक्षा अर्जासोबत आधार कार्ड अपलोड करावे लागणार आहे. कोरोना नंतर परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर उमेदवार घोषणापत्र आणि परीक्षा अर्ज साक्षांकित करुन ईमेल आयडीद्वारे आणि पोस्टानं आयसीएआयला पाठवू शकतात.
आयसीएआयनं सीए फाऊंडेशन परीक्षेचा अर्ज भरताना बारावीचं हॉल तिकीट अपलोड करण्याच्या अटीमध्येही सवलत दिली आहे. देशात कोरोना विषाणू संसर्ग असल्यानं बारावीच्या परीक्षा लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांकडे हॉल तिकीट उपलब्ध नाहीत. ही अडचण समजून घेत आयसीएआयनं बारावीचं हॉल तिकीट अपलोड करण्यामध्ये सवलत दिली आहे. कोरोना विषाणू संसर्गानंतर परिस्थिती सामान्य झाली की बारावीच्या हॉल तिकीटची झेरॉक्स आयसीएआयच्या पत्त्यावर किंवा ईमेल आयडीवर पाठवण्याच्या सूचना देणात आल्या आहेत.
जून सत्रासाठी नोंदणीसाठीची अंतिम तारीख 4 मे आहे. विलंब शुल्कासहीत अर्ज करण्याची शेवटची मुदत 7 मे पर्यंत आहे. ज्या विद्यार्थ्यांना नोंदणी करायची आहे ते icaiexam.icai.org वेबसाईटवर भेट देऊन अर्ज करु शकतात. भारतातील विद्यार्थ्यांसाठी परीक्षेचे शुल्क 1500 रुपये तर परदेशी विद्यार्थ्यांसाठी 325 अमेरिकनं डॉलर इतकं शुल्क राहील.
डबल मास्क आणि फेस शिल्ड वापरा, मुंबई पोलीस आयुक्तांचे आदेश https://t.co/jZUwiTLqkj #MumbaiPolice | #CoronaCurfew | #Mask
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 27, 2021
संबंधित बातम्या:
ICAI कडून CA परीक्षेसाठी नवी घोषणा, विद्यार्थ्यांना नव्यानं करावं लागणार ‘हे’ काम
युजीसीचा मोठा निर्णय, सीएच्या डिग्रीला आता पदव्युत्तर शिक्षणाची मान्यता
(ICAI CA Foundation June exam 2021 registration process icai gave some relief to students check here )