नवी दिल्ली : भारतीय सेनेत अग्नीवीर योजनेअंतर्गत घेण्यात आलेल्या भरतीचा निकाल जाहीर झाला आहे. यासाठी परीक्षा देणाऱ्या उमेदवारांनी इंडियन आर्मीच्या अधिकृत वेससाईटवर जाऊन निकाल तपासावा. joinindianarmy.nic.in या साईटवर जाऊन निकाल पाहता येणार आहे. महाराष्ट्र, गुजरात, गोवा,दादर, नगर हवेलीच्या केंद्र शासित प्रदेशातील सुमारे २५ लाख उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती.
भारतीय सेनेने जारी केलेल्या नोटीफीकेशननुसार, यंदा अग्नीवीर भरतीसाठी आवेदन प्रक्रिया १६ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरू झाली. अर्ज भरण्यासाठी २० मार्च २०२३ पर्यंत वेळ मिळाला. अॅडमीट कार्ड ५ एप्रिल २०२३ ला जारी झाले. आता झोननुसार निकाल जाहीर करण्यात येत आङे. आपल्या झोननुसार निकाल पाहावा लागणार आहे.
निकाल तपासण्यासाठी अधिकृत वेबसाईट joinindianarmy.nic.in येथे जावे लागेल.
होमपेजवर झोननुसार विकल्प राहील
आपल्या झोनवर जाऊन निकालावर क्लीक करावे
निकाल पीडीएफ फॉर्मेटमध्ये खुलेल
रोल नंबर सर्च करून निकाल तपासू शकता
आर्मी अग्नीवीर सीईई परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना शारीरिक फिटनेस आणि परीक्षणासाठी सहभागी होता येते. शेवटी मेडिकल चाचणीसाठी उपस्थित राहावे लागते. अग्नीवीरसाठी घेतलेल्या लेखी परीक्षेच्या आधारावर भरती प्रक्रियेसाठी बोलावले जाते. अग्नीवीर भरतीसाठी आर्मी प्रक्रियेत बदल करण्यात आले आहेत. अग्नीवीर भरतीच्या लेखी परीक्षेत निवड झालेल्या उमेदवारांना पुढील प्रक्रियेसाठी बोलावले जाते.