नवी दिल्ली | 16 सप्टेंबर 2023 : इंडीयन आर्मीच्या हेडक्वार्टर साऊथ कमांडने साल 2023 साठी ग्रुप सी पदासाठी नोकर भरती सुरु केली आहे. या भरती अंतर्गत एकूण 24 पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी 18 सप्टेंबर 2023 पासून अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 8 ऑक्टोबर आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाईटवर जाऊन अधिक माहिती घेऊ शकतात. अर्जदारांना https://www.hqscrecruitment.in/ या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.
इंडीयन आर्मी हेडक्वार्टर साऊथ कमान ग्रुप सी भरती 2023 साठी कोणताही अर्ज शुल्क असणार नाही. त्यामुळे उमेदवारांनी कोणतेही शुल्क न भरता येथे मोफत अर्ज करु शकता. उमेदवाराचे वय 18 वर्ष ते कमाल 25 दरम्यान असायला हवे. या भरतीसाठी उमेदवाराच्या वयाची मोजणी 8 ऑक्टोबर 2023 या तारखेच्या आधारे करावी असे आवाहन भारतीय लष्कराने केले आहे. या ग्रुप सी पदासाठी 18 सप्टेंबर 2023 पासून अर्ज प्रक्रीया सुरु होणार असून शेवटची तारीख 8 ऑक्टोबर 2023 अशी आहे. परीक्षेसाठीच्या तारखांना नंतर जाहीर करण्यात येणार आहे.
इंडीयन आर्मी हेडक्वार्टर साऊथ कमांड ग्रुप सी पदासाठी 10 वी पास विद्यार्थी अर्ज करु शकणार आहेत. उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटवरील शैक्षणिक अर्हतेची माहीती स्वत: वाचून आपला अर्ज करावा. इंडीयन आर्मी साऊथ कमान ग्रुप सी पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 18000 – 63200 प्रति महीने वेतन दिले जाऊ शकते. आरबीआयच्या रिक्त जागा आणि 2023 च्या भरतीकरीता अर्ज करण्यासाठी https://www.hqscrecruitment.in/ या वेबसाईटवर जाऊन माहिती घ्यावी. इंडीयन आर्मी या पदासाठी तारखानंतर जाहीर करणार आहे.