Indian Navy SSR AA Recruitment 2021:इंडियन नेव्हीमध्ये 2500 पदांसाठी भरती, 69 हजारांपर्यंत पगार, वाचा सविस्तर

| Updated on: Apr 23, 2021 | 12:25 PM

भारतीय नौदलामध्ये सिनिअर सेकेंडरी रिक्रूट (SSR) पदासाठी 2000 आणि आर्टिफीसर अप्रेंटिस (AA) पदासाठी 500 जागांवर भरती होणार आहे. Indian Navy SSR AA Recruitment

Indian Navy SSR AA Recruitment 2021:इंडियन नेव्हीमध्ये 2500 पदांसाठी भरती, 69 हजारांपर्यंत पगार, वाचा सविस्तर
इंडियन नेव्हीमध्ये 2500 जागांवर संधी
Follow us on

Indian Navy SSR AA Recruitment 2021:नवी दिल्ली: भारतीय नौदलात नोकरी करण्याची तुमची इच्छा असेल तर चांगली संधी आहे. भारतीय नौदलामध्ये सिनिअर सेकेंडरी रिक्रूट (SSR) पदासाठी 2000 आणि आर्टिफीसर अप्रेंटिस (AA) पदासाठी 500 जागांवर भरती होणार आहे. या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात 26 एप्रिल 2021 पासून होणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अखेरची मुदत 5 मे 2021 निश्चित करण्यात आली आहे. उमेदवारांनी अर्ज भरल्यानंतर त्यांच्या दहावी, बारावी आणि शैक्षणिक गुणांच्या आधारावर गुणवत्ता यादी बनवली जाईल. गुणवत्ता यादीमध्ये ज्यांचं नाव असेल त्यांना परीक्षेसाठी आमंत्रित केले जाईल. लेखी परीक्षा 23 जुलै रोजी होणार आहे. (Indian Navy SSR AA Recruitment 2021 for 2500 posts click here for details)

पदांचा तपशील

आर्टिफिसर अप्रेंटिस निवाक (Sailor AA) – 500 पदे

सेकंडरी रिक्रूट नाविक (Sailor SSR) – 2000 पदे

एकूण पदांची संख्या – 2500

पात्रता:

भारत सरकार/राज्य सरकार द्वारा मान्यताप्राप्त शाळा/बोर्डाकडून12 वी विज्ञान शाखेचीपरीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. 12वी मॅथ्स, फीजिक्स विषय अभ्यासलेला असणं आवश्यक आहे. यासोबत बारावीमध्ये केमिस्ट्री, बायोलॉजी आणि कंप्यूटर सायन्स यापैकी एका विषयाचा देखील समावेश असावा, आर्टिफीसर अप्रेंटिस पदासाठी अर्ज करणाऱ्यांना उमेदवारांना दहावीच्या परीक्षेला कमीत कमी 60 टक्के गुण असणं आवश्यक आहे.

वयोमर्यादा नेमकी किती?

भारतीय नौदलातालील या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदावारांचा जन्म 01 फेब्रुवारी 2001 ते 31 जुलै 2004 दरम्यान झालेला असावा.

निवड कशी होणार?

उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, शारीरिक क्षमता चाचणी, वैद्यकीय चाचणीद्वारे केली जाईल.

वेतन किती मिळणार?

सिनिअर सेकेंडरी रिक्रूट (SSR) पदासाठी 2000 आणि आर्टिफीसर अप्रेंटिस (AA) पदासाठी 21,700 ते 69,100 रुपये पगार मिळणार आहे.

अर्ज कुठे करायचा?

पात्र आणि इच्छुक उमेदवार 26 एप्रिल पासून भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाईट www.joinindiannavy.gov.in वर भेट देऊन अर्ज करु शकतात.

संबंधित बातम्या:

E pass how to apply : जिल्ह्याबाहेर प्रवास करण्यासाठी ई-पास कसा मिळवायचा? सोप्या टिप्स

‘या’ बँकेत नोकरीची सुवर्णसंधी, अनेक पदं रिक्त, थेट 60 लाखांपर्यंत पगार

आघाडीच्या ‘या’ 5 IT कंपन्या कोरोनात बेरोजगारांना देणार मोठा दिलासा, 1 लाखांहून अधिक भरती करणार

(Indian Navy SSR AA Recruitment 2021 for 2500 posts click here for details)