Railway Jobs : ना परीक्षेची झंझट, ना मुलाखतीचं टेन्शन, 10 वी पास उमेदवारांना रेल्वेत मोठी संधी

| Updated on: Mar 10, 2021 | 1:58 PM

वेस्ट सेंट्रल रेल्वेनं विविध पदासांठीच्या अप्रेंटिससाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. (West Central Railway Apprentice)

Railway Jobs : ना परीक्षेची झंझट, ना मुलाखतीचं टेन्शन, 10  वी पास उमेदवारांना रेल्वेत मोठी संधी
रेल्वे
Follow us on

Railway Recruitment 2021: मुंबई: जर आपण दहावी उत्तीर्ण असाल आणि सरकारी नोकरी (Sarkari Naukri) शोधत असाल तर रेल्वेने तुमच्यासाठी मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. रेल्वेमध्ये अनेक पदांवर भरती सुरू आहे.वेस्ट सेंट्रल रेल्वेनं विविध पदासांठीच्या अप्रेंटिससाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. एकूण 130 पदांवर भरती करण्यात येणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू असून, इच्छुक आणि पात्र उमेदवार 15 मार्च 2021 पर्यंत अर्ज करू शकतात. ज्यांना या पदांवर अर्ज करायचा आहे, त्यांनी खाली दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा. (Indian Railways recruitment 2021 West Central railway jobs in rrb rrc apprentice application last date soon know full details)

Railway Recruitment Notification: पदाचे नाव आणि संख्या

वेस्ट सेंट्रल रेल्वे (Western Central Railway) विभागात 130 पदावंर अप्रेटिससाठी संधी देण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी अर्ज करणं आवश्यक आहे.

पात्रता

दहावीमध्ये फक्त उमेदवाराचे किमान 50 टक्के गुण असले पाहिजेत. उमेदवारचा संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय झालेला आवश्यक आहे.

वय श्रेणी:

अप्रेंटिससाठी उमेदवारांचं वय 15 ते 24 वर्षांदरम्यान असणं आवश्यक आहे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादेत सूट असेल.

अर्ज करण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची गरज?

रेल्वेतील अप्रेंटिस या पदासाठी अर्ज करु इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे काही स्कॅन केलेले कागदपत्र असणं गरजेचं आहे. ही कागदपत्र तुम्हाला अर्ज करताना अपलोड करावी लागणार आहे.

1. पासपोर्ट साईज फोटो
2. उमेदवारांचं स्वाक्षरी
3. 10वी पास सर्टिफिकेट
4. ITI पास सर्टिफिकेट

अर्ज करण्याचा अंतिम दिनांक

वेस्ट सेंट्रल रेल्वेमधील अप्रेंटिस पदासाठी अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 15 मार्च 2021 आहे.

निवड प्रक्रिया कशी?

उमेदवारांची निवड ही मेरीटच्या आधारावर होणार आहे. उमेदवारांचं मेरीट त्याचे 10वीचे मार्क आणि ITI मध्ये मिळालेल्या मार्कावर ठरवलं जाईल. महत्वाची बाब म्हणजे या भरती पक्रियेसाठी कोणतीही लिखीत परीक्षा किंवा मुलाखत घेतली जाणार नाही.

अर्जाचं शुल्क

खुला आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्जाच शुल्क 100 रुपये आहे. तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी कोणतही शुल्क नाही. मात्र, सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन सेवा पोर्टल शुल्क 70 रुपये आणि 18 रुपये जीएसटी शुल्क द्यावं लागेल.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी क्लिक करा

अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा

संबंधित बातम्या:

Railway Jobs : 10वी पाससाठी तरुणांसाठी मोठी संधी, कुठल्याही परीक्षेविना मिळवा नोकरी

India Post Recruitment 2021 : 10वी पास असाल तर तुम्हाला सरकारी नोकरीची संधी!

(Indian Railways recruitment 2021 West Central railway jobs in rrb rrc apprentice application last date soon know full details)