ITBP Head Constable Recruitment 2023 : इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस फोर्स (ITBP) ने हेड कॉन्स्टेबल पदासाठी भरतीचे नोटिफिकेशन प्रसिद्ध केली आहे. ‘सी’ गट (अ-राजपत्रित आणि अ-मंत्रालयीन) पदांसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया 9 जून 2023 पासून सुरू होईल आणि 8 जुलै 2023 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. recruitment.itbpolice.nic.in या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन पद्धतीने अर्ज सबमिट करावे लागतील.
या भरती प्रक्रियेद्वारे, ITBP हेड कॉन्स्टेबल (मिडवाइफ) – ‘सी’ गट (अ-राजपत्रित आणि अ-मंत्रालयीन) ची एकूण 81 पदे भरली जातील. निर्धारित तारखेपासून नियमांनुसार उमेदवार अर्ज करू शकतात.
शैक्षणिक पात्रता
या पदासाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून इयत्ता 10 वी परीक्षा उत्तीर्ण करणे अनिवार्य आहे. यासोबतच अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे सहाय्यक नर्सिंग मिडवाइफरीचे प्रमाणपत्रही असायले पाहिजे. आणि उमेदवाराची नोंदणी केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या नर्सिंग कौन्सिलमध्येही झाली पाहिजे.
वयोमर्यादा किती असावी ?
जे उमेदवार या पदासाठी अर्ज करतील त्या उमेदवारांचे वय 18 पेक्षा कमी आणि 25 वर्षांपेक्षा जास्त नसावे. ओबीसी, एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांनाही नियमानुसार कमाल वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. त्याच वेळी, सर्व श्रेणीतील उमेदवारांना अर्ज शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे. अधिक तपशीलांसाठी, उमेदवार ITBP च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.
ITBP भरतीसाठी कसा करावा अर्ज ?
– प्रथम recruitment.itbpolice.nic.in या अधिकृत वेबसाइट वर जा.
– येथे संबंधित भरतीसाठी अर्ज करण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
– तेथे विचारण्यात आलेले तपशील व्यवस्थित भरा आणि अर्ज प्रक्रिया सुरू करा.
– सर्व कागदपत्रे, डॉक्युमेंट्स अपलोड करा आणि सबमिट करा.
हेड कॉन्स्टेबल पदांसाठी निवड प्रक्रिया PST, PET आणि लेखी परीक्षेद्वारे केली जाईल. परीक्षेचा पॅटर्न (Exam Pattern) अधिकृत वेबसाइटवर जाहीर करण्यात आला आहे.