Jobs 2024 : गलेलठ्ठ पगार हवा तर मग आजच करा अर्ज; इथे वाचा माहिती सविस्तर

| Updated on: Aug 30, 2024 | 4:24 PM

IRDAI Recruitment 2024 : भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणात तुम्हाला नोकरीची संधी आहे. प्राधिकरणात करिअर करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यासाठी अगोदर झटपट अर्ज प्रक्रिया पूर्ण करा.

Jobs 2024 : गलेलठ्ठ पगार हवा तर मग आजच करा अर्ज; इथे वाचा माहिती सविस्तर
IRDEA पदभरती
Follow us on

IRDAI Jobs 2024 : नोकरीच्या शोधात असाल तर मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाच्या वतीने भरती प्रक्रिया राबविण्याबाबत सूचना देण्यात आली आहे. सरकारी नोकरी मिळण्याची अमूल्य संधी तुम्ही दवडू नका. IRDAI ने एकूण 49 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवारांनी प्राधिकरणाची अधिकृत साईट irdai.gov.in वर जाऊन अर्ज करावा. अर्ज करण्याची अखेरची संधी 20 सप्टेंबर निश्चित करण्यात आली आहे.

भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाच्या या भरती अभियानात असिस्टंट मॅनेजरच्या एकूण 49 पद भरण्यात आली. त्यातंर्गत सामान्य प्रवर्गासाठी 21 पद, ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठी 4 पद, ओबीसीसाठी 12 पद, एससीसाठी 8 आणि एसटी प्रवर्गासाठी 4 पद आरक्षित करण्यात आली आहेत.

या पदासाठी पदवीला 60 टक्के गुण आवश्यक आहे. तर 2019 मध्ये AIA चे 7 पेपर उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. फायनान्ससाठी 60% गुणांसह पदवीधर आणि ACA/CFA अभ्यासक्रम पूर्ण असावा. IT साठी B.E अथवा MCA पदवी असणे आवश्यक आहे. तर संशोधन, रिसर्च पदासाठी अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी हवी.

हे सुद्धा वाचा

वयाची मर्यादा काय

या भरती प्रक्रियेत अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 21 वर्ष ते 30 वर्ष या दरम्यान आहे. तर आरक्षित गटातील उमेदवारांसाठी सरकारने वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार सवलत देण्यात येईल.

कशी होईल निवड

भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाच्या (IRDA) पदासाठी लिखित परीक्षा आणि मुलाखत होईल. त्यानंतर योग्य उमेदवाराची या पदासाठी निवड करण्यात येईल. वेगवेगळ्या पदासाठी विविध परीक्षा पॅटर्न आहे. त्यातील एक पेपर 90 मिनिटांचा तर दुसरा पेपर हा 60 मिनिटांचा असेल.

या पदासाठी पगार किती?

भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणात सहाय्यक व्यवस्थापकाच्या पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना 44 हजार 500 रुपये सुरुवातीला वेतन मिळेल. त्यात विविध भत्त्यांचा समावेश होऊन नंतर वेतन 1 लाख 46 हजार रुपयांच्या जवळपास जाईल.

अर्जासाठी इतके आहे शुल्क

या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज प्रक्रिया शुल्क अदा करावे लागणार आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 750 रुपये शुल्क भरावे लागणार. तर आरक्षीत वर्गाच्या उमेदवारासाठी हे शुल्क 100 रुपये आहे. याविषयीची अतिरिक्त माहिती उमेदवारांना प्राधिकरणाच्या अधिकृत संकेतस्थळावर मिळेल.