नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदवार्ता आली आहे. जगातील सर्वात मोठी कंपनी लाखो नोकऱ्या देणार आहेत. तंत्रज्ञान शाखेत करिअर करणाऱ्या तरुणांनासह सर्वसाधारण क्षेत्रातील तरुण आणि कुशल कामगारांना संधी देण्यात येणार आहे. ही कंपनी मार्च 2025 पर्यंत देशात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या जवळपास 6 लाख नोकऱ्या देणार आहे. यातील दोन लाख नोकऱ्या या थेट देण्यात येतील तर 4 लाख जॉब अप्रत्यक्ष देण्यात येतील.
ॲप्पल करणार मालामाल
इकनॉमिक टाईम्सनुसार, आयफोन सारखे ब्रँड तयार करणारी जगातील सर्वात मोठी कंपनी ॲप्पलने (Apple) चीनमधील सर्व बाडबिस्तर आवरले आहे. तिथला सर्व व्यापार आणि उद्योग बंद करत भारतात बस्तान बसवण्याच्या तयारीत ॲप्पल आहे. त्याचा भारताला मोठा फायदा होईल. चालू आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत देशात 2 लाखांपेक्षा अधिक थेट नोकऱ्या तयार होतील. यामध्ये 70 टक्के नोकऱ्या या महिलांसाठी राखीव असतील.
मार्चपर्यंत 6 लाख जॉब
सरकारकडून थेट आणि अप्रत्यक्ष नोकऱ्यांच्या सूत्राचा विचार करता, मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत ॲप्पल 5 ते 6 लाख जॉब देईल. एक प्रत्यक्ष नोकरी दोन अप्रत्यक्ष नोकऱ्या तयार करते, असा सरकारचा फॉर्म्युला आहे. या सूत्रानुसार, देशात 2 लाख प्रत्यक्ष नोकऱ्या तयार झाल्या तर किमान 3 ते 4 लाख अप्रत्यक्ष नोकऱ्या तयार करतील.
कंपनीने सुरु केले प्रशिक्षण
ॲप्पलने तामिळनाडू येथील फॅक्ट्रीत हजारो कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. या कर्मचाऱ्यांना आयफोन 16 प्रो आणि प्रो मॅक्सचे उत्पादन करण्याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. ही दोन्ही मॉडेल कंपनी लवकरच बाजारात उतरवणार आहे. साधारणतः सप्टेंबर महिन्यात हा स्मार्टफोन बाजारात आणण्यात येणार आहे. मनीकंट्रोलच्या दाव्यानुसार, कंपनी तिचे दोन्ही टॉप मॉडेल आयफोन प्रो आणि प्रो मॅक्सचे तयार करणारा भागीदार कंपनी फॉक्सकॉन टेक्नोलॉजी समूहसोबत देशात हे फोन तयार करणार आहे.
लवकरच तयार होणार युनिट
फॉक्सकॉन तामिळनाडू प्रकल्पात नवनवीन उत्पादनं सुरु करण्यात येणार आहे. आयफोन 16 चे प्रो मॉडेल तयार होणार आहे. कंपनी या उत्पादनाविषयीची निमंत्रण पत्रिका सुद्धा तयार केली आहे. कंपनीचे हे प्रिमियम मॉडेल 9 सप्टेंबर रोजी लाँच होण्याची शक्यता आहे. ॲप्पल आयफोन 16 सीरीज मध्ये 4 मॉडेल्स लॉन्च होतील. यामध्ये आयफोन16, आयफोन 16 प्लस, आयफोन 16 प्रो आणि आयफोन 16 प्रो मॅक्स यांचा समावेश असेल.