Jobs In India : नोकऱ्यांचा हंगाम! या क्षेत्रात येणार लाट, 7 लाख तरुणांच्या हाताला मिळेल काम

| Updated on: Sep 05, 2023 | 1:58 PM

Jobs In India : या वर्षात 2023 च्या नोव्हेंबरपर्यंत सणासुदीच्या काळात नोकऱ्यांचा पाऊस पडणार आहे. कुशल कामगारांना या काळात मोठी मागणी असेल. काही क्षेत्रातील कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात तरुणांच्या हाताला काम मिळेल.

Jobs In India : नोकऱ्यांचा हंगाम! या क्षेत्रात येणार लाट, 7 लाख तरुणांच्या हाताला मिळेल काम
Follow us on

नवी दिल्ली | 5 सप्टेंबर 2023 : देशातील अनेक सेक्टर्समधील कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नोकऱ्यांचा पाऊस पडणार आहे. या सेक्टरमध्ये येत्या नोव्हेंबर महिन्यात, म्हणजे दिवाळीच्या काळात मोठ्या प्रमाणात रोजगार (Hiring in India) उपलब्ध होईल. या सेक्टर्समधील अनेक कंपन्यांना कुशल बळ लागू शकते. या कंपन्या मोठ्या प्रमाणात कुशल आणि अकुशल कर्मचारी, कामगारांची भरती करण्याची दाट शक्यता आहे. देशातील दक्षिणेतील राज्यात अनेक परदेशी ब्रँड्स त्यांचे प्रकल्प उभारत आहे. या प्रकल्पात मोठ्या प्रमाणात कामगारांची गरज भासणार आहे. या वर्षात 2023 च्या नोव्हेंबरपर्यंत सणासुदीच्या काळात नोकऱ्यांचा पाऊस (Jobs In India) पडणार आहे. तेव्हा तरुणांनी त्यांचा बायोडाटा तयार ठेवावा. अनुभवी आणि फ्रेशर्सना ही संधी मिळू शकते.

7 लाख नोकऱ्या

भारतात पुढील दोन महिन्यात ई-कॉमर्स, रिटेल, एफएमसीजी आणि लॉजिस्टिक या सेक्टर्समध्ये नोकऱ्या उपलब्ध होतील. एका अंदाजानुसार या क्षेत्रात जवळपास 7 लाख नोकऱ्या तयार होतील. त्यासाठी मुबलक प्रमाणात कुशल मनुष्यबळ आणि अकूशल कामगारांची गरज भासणार आहे. नोव्हेंबरपर्यंत या सेक्टरमध्ये नोकऱ्या उपलब्ध होतील.

हे सुद्धा वाचा

दक्षिणेत जास्त पर्याय

TeamLease सर्व्हिसेच्या नोकरीविषयक अंदाजानुसार, सर्वाधिक नोकऱ्या दक्षिण भारतात उपलब्ध होण्याचा अंदाज आहे. या भागात 4 लाख कर्मचाऱ्यांना नोकऱ्या मिळू शकतात. दक्षिण भारतातील बेंगळुरु शहरात 40 टक्के, चेन्नईमध्ये 30 टक्के तर हैदराबाद या शहरात 30 नोकऱ्या मिळतील.

कोणासाठी आहे ही संधी

रिपोर्टमधील दाव्यानुसार, गिग वर्कर्ससाठी या नोकऱ्या असतील. यामध्ये फूड डिलिव्हरी कंपन्या, डोअर-टू-डोअर वस्तू पुरवठा कंपन्यांचा सर्वाधिक समावेश आहे. गिग वर्कर्सची सर्वाधिक संधी दक्षिणेतील राज्यांमध्ये आहे. आता उपनगरे आणि निम शहरी या भागात अशा करिअरची सर्वाधिक संधी आहे. यामध्ये कोईम्बतूर, कोची आणि म्हैसूर या शहरांचा समावेश आहे.

या कर्मचाऱ्यांना मोठी संधी

या नवीन नौकऱ्यांमध्ये 30 टक्के वॉशरहाऊस ऑपरेशन, लास्ट मिल डिलिव्हरी 60 टक्के, 10 टक्के कॉल सेंटर्समधील कर्मचाऱ्यांसाठी गेल्या वर्षाच्या तुलनेत गिग जॉबमध्ये 25 टक्के वाढ झाली आहे. तर दक्षिणेतील राज्यात या सेक्टरमध्ये 30 टक्क्यांहून अधिकची वाढ होण्याची शक्यता आहे.

फ्लिपकार्ट देईल 1 लाख जॉब्स

सोमवारी फ्लिपकार्टने बिग बिलियन डे आणि फेस्टिव्हल सीझनमध्ये 1,00,000 नोकरी देण्याची घोषणा केली आहे. इंडस्ट्री अहवालानुसार, भारतात ग्राहकांचा खर्च 2030 पर्यंत 4 खरब डॉलरहून अधिक असेल. ई-कॉमर्स ई टेल इकोसिस्टमचे GMV या आर्थिक वर्षात 2023 मध्ये 22 टक्क्यांहून 60 अब्ज डॉलरवर पोहचले.