पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात प्रसिद्ध केली होती. राज्य सेवा परीक्षा 2021 अंतर्गत 290 पदांसाठी 16 संवर्गात भरती होणार होती. आता एमपीएससीकडून पदसंख्येमध्ये वाढ करण्यात आली आहे. 100 पदं वाढल्यामुळं आता 390 पदांसाठी 2 जानेवारी 2022 ला एमपीएससीकडून राज्य सेवा पूर्व परीक्षा आयोजित केली जाईल. पदांच्या संख्येत वाढ झाल्यानं विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
आज एमपीएससीनं नवीन परिपत्रक काढत एकूण 20 संवर्गात 390 पदांची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. क्लास 1 ( गट अ च्या ) 100 जागा वाढल्याने उमेदवारांमध्ये आनंदाच वातावरण आहे.
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. पूर्व परीक्षा दिनांक 2 जानेवारी, 2022 रोजी व मुख्य परीक्षा दिनांक 7, 8 व 9 मे, 2022 रोजी आयोजित करण्यात येईल.
जाहिरात क्रमांक 106/2021 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 च्या पदसंख्येमधील वाढीसंदर्भातील शुद्धिपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. pic.twitter.com/uFjOjorZLl
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) October 8, 2021
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. मुख्य परीक्षा दिनांक 7, 8 व 9 मे, 2022 रोजी आयोजित करण्यात येईल. 2021 च्या राज्य सेवा पूर्व परीक्षेसाठी अर्ज दाखल करण्यास 5 ऑक्टोबर दुपारी 2 वाजल्यापासून होणार आहे. अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिनांक 25 ऑक्टोबर आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क 544 तर मागासवर्गीय उमेदावारंसाठी 344 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.
उपजजिल्हाधिकारी 12, पोलीस उपअधीक्षक 16, सहकार राज्य कर आयुक्त 16 , गटविकास अधिकारी 15, सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट-अ 15, उद्योग उप संचालक 4, सहायक कामगार आयुक्त 22, उपशिक्षणाधिकारी 25, कक्ष अधिकारी 39, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी 4, सहायक गटविकास अधिकारी 17, सहायक निबंधक सहकारी संस्था 18, उपअधीक्षक भूमि अभिलेख 15 , उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्कर 1, उप अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क 1,सहकारी कामगार अधिकारी 54, मुख्याधिकारी गट ब 75, मुख्याधिकारी गट अ 15 पदं, उपनिबंधक सहकारी संस्था गट अ 10 पदांसाठी परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.
इतर बातम्या:
Breaking : अखेर MPSC कडून महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा 2019 पदांचा मुलाखत कार्यक्रम जाहीर
Maharashtra Public Service Commission mpsc increased 100 post for state service exam publish revised advertisement for State Service exam 2021