International Women’s Day 2021| एनटीपीसी आणि ओएनजीसीकडून महिला दिनाचं गिफ्ट, विशेष भरती प्रक्रिया जाहीर

| Updated on: Mar 08, 2021 | 12:40 PM

एनटीपीसी आणि ओएनजीसीकडून महिला दिनानिमित्त विशेष भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. (NTPC and ONGC announced recruitment drive )

International Womens Day 2021| एनटीपीसी आणि ओएनजीसीकडून महिला दिनाचं गिफ्ट, विशेष भरती प्रक्रिया जाहीर
ओएनजीसी
Follow us on

नवी दिल्ली: सरकारच्या मालकीच्या ओएनजीसी आणि एनटीपीसीनं जागतिक महिला दिनानिमित्त मोठा निर्णय दिला आहे. ओएनजीसी आणि एनटीपीसी स्त्री-पुरुष विषमता दूर करण्यासाठी महिलांना महत्वाच्या पदावर संधी देणार आहे. दोन्ही कंपन्यांमध्ये त्यासाठी भरतीप्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. (NTPC and ONGC announced recruitment drive for women on International Women’s Day)

एनटीपीसीकडून विशेष भरती जाहीर

नॅशलन थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (एनटीपीसी) ही भारतातील मोठी वीज निर्माण करणारी कंपनी आहे. तर ऑईल अँड नॅच्युरल गॅस कॉर्पोरेशन ही तेल उत्पादक कंपनी आहे. एनटीपीसीनं महिला दिनानिमित्त महिलांसाठी विशेष भरती प्रक्रियेची घोषणा केली आहे. तर, ओएनजीसीनं तांत्रिक विभागात 100 महिलांना संधी देण्याचं जाहीर केलं आहे.

जागतिक महिला दिनाला घोषणा करणारी पहिली कंपनी

एनटीपीसी ही जागतिक महिला दिनानिमित्त महिलांनी नोकरी देण्यासाठी भरती प्रक्रिया जाहीर करणारी पहिली कंपनी ठरली आहे. कंपनीनं महिला आणि पुरुष यांचं नोकऱ्यांमधील प्रमाण सारखं ठेवण्याचं प्रमाण केलं आहे. एनटीपीसीनं अधिक महिलांना संधी देण्यासाठी भरती प्रकियेदरम्यानच्या अर्जाची फी रद्द केली आहे. एनटीपीसीकडून महिलांसाठी कामाच्या ठिकाणी बालसंगोपण केंद्र, मातृत्व रजा, पगारी रजा, एनटीपीसी विशेष बालसंगोपन रजा, अशा सुविधा महिलांसाठी उपलब्ध करुन दिल्या आहेत.

ओएनजीसीकडून 500 महिलांना संधी

ओएनजीसीनं यापूर्वी करण्यात आलेल्या 5 भरती प्रक्रियेमध्ये 500 महिलांना संधी दिली आहे. त्यापैकी 80 टक्के महिला तांत्रिक विभागात काम करतात. तांत्रिक विभागातील ड्रीलिंग, प्रोडक्शन, जिओलॉजी,जिओफिजीक्स विभागात महिला काम करतात, असं ओएनजीसीकडून सांगण्यात आलं आहे.


संबंधित बातम्या:

International Women’s Day! महिलांनो अडचणीत असाल तर ‘या’ नंबरवर करा फोन, सरकारची मोठी योजना

International Women’ Day 2021 : हेल्दी राहण्यासाठी लाईफस्टाइलमध्ये करा ‘हे’ बदल

‘तुम्ही तेव्हाच आमच्याशी लव्ह मॅरेज केलं असतं तर राज्यात युतीची सत्ता असती’, गुलाबराव पाटलांची महाजनांवर कोटी

कोरोनाचा कहर; महाराष्ट्र, केरळासह सहा राज्यांत सर्वाधिक कोरोना रुग्ण

(NTPC and ONGC announced recruitment drive for women on International Women’s Day)