नवी दिल्ली : विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्रातील मोदी सरकार लवकरच विद्यार्थ्यांच्या खात्यात 20 हजार रुपये जमा करणार आहे. हे पैसे पंतप्रधानांच्या विशेष शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत टाकले जाणार आहेत. विद्यार्थ्यांना हे पैसे देखभाल भत्ता स्वरूपात मिळणार असल्याची माहिती आहे. मात्र ही योजना फक्त जम्मू-काश्मीर आणि लडाखच्या विद्यार्थ्यांसाठी लागू आहे. ही योजना AICTE अर्थात ऑल इंडिया काऊन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनच्या मार्फत चालवली जाते. (Pm Special Scholarship Scheme 20 thousand Credited Student Account)
Prime Minister’s Special #Scholarship Scheme (#PMSSS)
A sum of Rs. 20,000 towards maintenance allowance would be credited in #students‘ account shortly… #implementation under progress.
Imp. circular as enclosed.@PMOIndia @narendramodi @EduMinOfIndia @DrRPNishank pic.twitter.com/CQ2KF5YbAj
— AICTE (@AICTE_INDIA) December 16, 2020
एआयसीटीईने (AICTE) जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये शिकणार्या 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी पंतप्रधान विशेष शिष्यवृत्ती योजना सुरु केली आहे. जुलैमध्ये ही योजना सुरु करण्यात आली होती. ही रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात पुन्हा टाकली जाईल, असं एआयसीटीईने प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. 16 डिसेंबरला रोजी काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात यासंबंधीची माहिती देण्यात आली आहे. या प्रसिद्धीपत्रकात 2020-21 च्या सत्रासाठी पूर्ण शैक्षणिक फी भरण्याची तयारी दाखवण्यात आली आहे.
पंतप्रधान विशेष शिष्यवृत्ती योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2016 मध्ये सुरु केली होती. या योजनेंतर्गत नेव्ही, सेना आणि हवाई दल कर्मचार्यांच्या मुलांना सरकार शिष्यवृत्ती देते. ज्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, त्यांना ऑनलाइन नोंदणी करावी लागेल. शिष्यवृत्ती योजनेस पात्र होण्यासाठी विद्यार्थ्यांनी जम्मू काश्मीर किंवा लडाखमधील JKBOS किंवा CBSE शाळांमधून 12 वी ची परीक्षा उत्तीर्ण केली असली पाहिजे.
देखभाल भत्ता म्हणून 1 लाख रुपये विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा केले जातात. वसतिगृह खर्च आणि जेवणाचा खर्च मिळून दरमहा 10 हजार रुपये विद्यार्थ्यांच्या अकाऊंटमध्ये टाकले जातात. 2019-20 या शैक्षणिक सत्रासाठी आधीच पैसे टाकले गेले होते. नंतर कोरोना साथीच्या आजारामुळे देशभरात शाळा व महाविद्यालये बंद झाली. केवळ ऑनलाईन वर्ग घेण्यास या काळात परवानगी होती. त्यामुळे वसतिगृह व मेस शुल्काचा या रकमेमध्ये समावेश करण्यात आलेला नाही.
विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाबद्दल जागरूक करण्यासाठी आणि त्यांचा अभ्यास सुरू ठेवण्यासाठी एआयसीटीईने विद्यार्थ्यांच्या खात्यात 20 हजार रुपये टाकण्याचा निर्णय घेतला आहे. ऑड सेमिस्टर अर्थात जुलै ते डिसेंबर 2020 दरम्यान ऑनलाईन शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना ही रक्कम दिली जाईल. जेव्हा विद्यार्थी त्यांच्या शाळांमध्ये उपस्थित असतील आणि त्यांचे वर्ग नियमित सुरु होतील तेव्हा उर्वरित पैसे दिले जातील, अशी माहिती एआयसीटीईने दिली आहे.
(Pm Special Scholarship Scheme 20 thousand Credited Student Account)
हे ही वाचा