पुणे : पुणे पोलीस दलात रिक्त असलेल्या शिपाई पदासाठी उद्या 5 ऑक्टोबरला लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. पोलीस आयुक्तालयातील शिपाई पदासाठीच्या या जागांसाठी उमेदवारांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळत आहे. अवघ्या 214 जागांसाठी 39,323 जणांनी अर्ज केले आहेत. पुण्यातील परीक्षा केंद्रावर पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
भरती प्रक्रियेत पहिल्यांदाच शारीरिक चाचणीच्या अगोदर लेखी परीक्षा घेतली जात आहे. त्यासाठी 22 सप्टेंबरपासून उमेदवारांना ऑनलाइन प्रवेशपत्र मिळायला सुरुवात झाली होती. आयुक्तालयाची लेखी परिक्षा जी. एस. सॉफ्टवेअर कंपनीमार्फत राबविण्यात येत आहे. आरोग्य विभागाच्या परीक्षांबाबत उडालेल्या गोंधळानंतर ही परीक्षा सुरळीत पार पडणार का, हे पाहावे लागेल.
पोलीस विभागातील पोलीस शिपाई पदासाठी उद्या लेखी परीक्षा होणार आहे. पुणे शहरासाठी एकूण 214 पदांसाठी ही परीक्षा होणार आहे. लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना शारीरिक चाचणी द्यावी लागेल. पुण्यातील परीक्षा केंद्रावर पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पुण्यातील विविध परीक्षा केंद्रांवर पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. तब्बल दोन वर्षानंतर पोलीस विभागात पोलीस शिपाई पदाची भरती होत आहे.
पुणे पोलिस दलात रिक्त असलेल्या 214 जागांसाठी 2019 मध्ये जाहिरात देण्यात आली होती. मात्र, गेल्या दीड वर्षापासून कोरोनाच्या साथीमुळे ही भरती प्रक्रिया लांबणीवर पडली होती. मात्र, आता ही प्रक्रिया पुन्हा सुरु झाल्याने उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला होता.
आरोग्य विभाग गट क आणि गट ड परीक्षा 25 आणि 26 सप्टेंबर रोजी घेण्यात येणार होती. परीक्षा आयोजित करण्याचं कंत्राट देण्यात आलेल्या कंपनीच्या घोळामुळं परीक्षा लांबणीवर टाकण्याची नामुष्की आरोग्य विभागावर आली होती. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी परीक्षेच्या नव्या तारखा जाहीर केल्या होत्या. 24 ऑक्टोबरला गट क आणि 31 ऑक्टोबरला गट ड परीक्षा आयोजत करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली होती. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यावतीनं येणारी परीक्षा 30 ऑक्टोबरला होणार आहे.
इतर बातम्या:
पोलीस आयुक्तालयातील शिपाई पदासाठी लेखी परीक्षा 5 ऑक्टोबरला, तयारी अंतिम टप्प्यात
पुणे पोलीस दलात भरती, शिपाई पदासाठी 5 ऑक्टोबरला लेखी परीक्षा, जाणून घ्या हॉलतिकीट कधी मिळणार?
Pune Police Constable recruitment 2021 written exam will be held tomorrow