मुंबई | 28 जुलै 2023 : रेल्वेमध्ये नोकरीची संधी मिळणार आहे. रेल इंडीया टेक्निकल एंड इकोनॉमिक सर्व्हीस ( RITES ) राईट्सने ड्राफ्ट्समनसह विविध पदासाठीची भरती प्रक्रीया सुरु केली आहे. या पदासाठी अनुरुप उमेदवारांना येत्या 7 ऑगस्टच्या सायंकाळ 5 वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे. राईट्सचे अधिकृत संकेतस्थळ rites.com वर ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.
रेल इंडीया टेक्निकल एंड इकोनॉमिक सर्व्हीस ( RITES ) राईट्सच्या या भरती मोहिमेचे लक्ष्य सिव्हील इंजिनिअर, पर्यावरण सामाजिक निरीक्षण तज्ज्ञ, ज्युनिअर डीझाईन इंजिनिअर, ड्राफ्टसमन आणि अन्य पदांवर 111 कर्मचाऱ्यांची नेमणूक करणे आहे. ही नियुक्ती सुरुवातीला एक वर्षांच्या अवधीकरीता कंत्राटी तत्वावरील असेल, परंतू नंतर अंतर्गत सहमती आणि उत्तम कामगिरी केल्यास या नियुक्तीला कामे संपेपर्यंत मुदतवाढ दिली जाणार आहे.
अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 1 जुलै 2023 रोजी 40 वर्षांहून कमी असायला हवे. आरक्षण असणाऱ्यांना वयात थोडी सूट देण्यात आली आहे. रेल इंडीया टेक्निकल एंड इकोनॉमिक्स सर्व्हीसनूसार ड्राफ्समन सहीत अन्य पदांवर अर्ज करणाऱ्या उमेदवारांजवळ संबंधित क्षेत्रातील स्नातक डीग्री असावी, उमेदवारांकडे दोन ते पाच वर्षांच्या कामाजा अनुभव असायला हवा.
सर्वात आधी अधिकृत वेबसाईट rites.com वर जावे,
होमपेजवर करीयर टॅबवर क्लीक करावे,
करियर अंतर्गत ऑनलाईन नोंदणीकरण भागावर क्लिक करावे.
पायरी क्र. 1 नोंदणीची लिंक भरावी आणि लॉगिन करावे.
वॅकेन्सी नंबरवर क्लिक करावे आणि फॉर्म भरावा.
संपूर्ण भरलेला फॉर्म सबमिट करावा, डाऊनलोड करुन प्रिंट काढावे.