Railway Jobs : तुम्हीही नोकरीच्या शोधात असाल तर एक मोठी सुवर्णसंधी समोर चालून आली आहे. मध्य रेल्वेत मेगा भरती होणार आहे. पश्चिम मध्य रेल्वेने अप्रेंटिसशिप ट्रेनिंगसाठी बंपर भरती जारी केली आहे. रेल्वेतील या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 15 डिसेंबर 2023 ला सुरू झाली. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 14 जानेवारी 2024 आहे. पश्चिम मध्य रेल्वेच्या wcr.Indianrailways.gov.in या वेबसाइटला भेट देऊन अर्ज करता येऊ शकतो. अधिसूचनेनुसार, पश्चिम मध्य रेल्वेच्या भरती मोहिमेद्वारे प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणासाठी तब्बल 3015 रिक्त पदांची भरती केली जाणार आहे.
पश्चिम मध्य रेल्वे मध्ये डिव्हीजन वाईज व्हेकन्सी
जेबीपी डिव्हीजन: 1164 पदं
बीपीएल डिव्हीजन : 603 पदं
कोटा डिव्हीजन : 853 पदं
सीआरडब्ल्यूएस बीपीएल : 170 पदं
डब्ल्यूआरएस कोटा : 196 पदं
मुख्यालय/जेबीपी : 29 पदं
शैक्षणिक योग्यता
पश्चिम मध्य रेल्वेमध्ये अप्रेंटिसशिपसाठी किंवा शिकाऊ उमेदवारांसाठी, किमान 50 % गुणांसह 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच, एखाद्याने NCVT/SCVT द्वारे मान्यताप्राप्त संस्थेतून ITI केलेले असावे.
वयोमर्यादा किती ?
पश्चिम मध्य रेल्वेमध्ये अप्रेंटिसशिप ट्रेनिंगच्या भरतीसाठी वयोमर्यादा 15 ते 24 वर्षांच्या दरम्यान आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार कमाल वयोमर्यादेत सूट मिळेल. SC/ST उमेदवारांना 5 वर्षांची सूट मिळेल आणि OBC ला तीन वर्षांची सूट मिळेल. दिव्यांग उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत 10 वर्षांची सूट मिळेल. SC, ST प्रवर्गातील उमेदवारांना 15 वर्षांची सूट आणि OBC प्रवर्गातील अपंग उमेदवारांना 13 वर्षांची सूट मिळेल.
अर्जाचे शुल्क किती ?
पश्चिम मध्य रेल्वेमध्ये होणाऱ्या या भरतीसाठी जो अर्ज भरावा लागेल, त्याचे शुल्क अथवा फी ही 136 रुपये आहे. तर SC, ST, दिव्यांग आणि महिला उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 36 रुपये आहे.
सिलेक्शन कसं होणार ?
पश्चिम मध्य रेल्वेमध्ये अप्रेंटिसशिप ट्रेनिंगच्या भरतीसाठी 10वी आणि ITI मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. दोन्हीचे गुण जोडून मेरिट तयार केली जाईल. मेरिट लिस्ट ट्रेड, डिवीजन/यूनिट आणि कम्युनिटी नुसार बनवली जाईल.