RRB Job Alert 2021 नवी दिल्ली : वैद्यकीय कर्मचारी पदासाठी सरकारी नोकरी शोधत असलेल्या तरुणांसाठी एक मोठी संधी आली आहे. मेडिकल प्रॅक्टिशनर आणि पॅरामेडिकल स्टाफ(Practitioners and Paramedical Staff)च्या पदांच्या रिक्त जागांसाठी पश्चिम रेल्वे(Western Railway)ने भरतीची अधिसूचना जारी केली आहे. या भरती अंतर्गत एकूण 139 जागांसाठी भरती करण्यात येणार आहे. अशा परिस्थितीत ज्या कोणालाही या पदांसाठी अर्ज करावयाचा आहे तो आधिकृत वेबसाईट wr.indianrailways.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतो. (Recruitment for various posts in the Railways including Paramedical Staff, know Detailed Information)
पश्चिम रेल्वेने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 3 एप्रिलपासून सुरू झाली आहे. या पदांवर (Practitioners and Paramedical Staff) अर्ज करण्यासाठी फक्त चार दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. पात्र उमेदवार 6 एप्रिलपर्यंत अर्ज करू शकतात. त्याचबरोबर या पदांच्या उमेदवारांची मुलाखत 8 एप्रिल 2021 रोजी घेण्यात येईल.
या भरती अंतर्गत एकूण 139 जागांसाठी भरती करण्यात येणार आहे. यात सीएमपी-जीडीएमओ(CMP-GDMO)ची 14 पदे, नर्सिंग सुपरिटेंडंटची 59 पदे, रेडिओग्राफरची 2, रेनल रिप्लेसमेंटची 1, क्लिनिकल सायकॉलॉजिस्टची 2 पदे आणि हॉस्पिटल अटेंडंटची 60 पदांसाठी भरती होणार आहेत. अर्जाच्या पूर्ण माहितीसाठी कृपया अधिकृत सूचना पहा. या पदांसाठी उमेदवारांची निवड टेलिफोनिक मुलाखतीतून केली जाईल.
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडून जन्म प्रमाणपत्र, उत्तीर्ण झालेल्या परीक्षेचे उत्तीर्ण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. नोंदणी प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र आणि जात प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे.
या पदांवर अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे दहावी, बारावी, पदवी आणि पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित क्षेत्राचा अनुभव असणे महत्वाचे आहे. शैक्षणिक पात्रतेबद्दल अधिक माहितीसाठी आपण अधिकृत अधिसूचना पाहू शकता. या व्यतिरिक्त अर्ज करणारे उमेदवार 18 ते 53 वर्षे वयोगटातील असावेत.
जे उमेदवारांची पश्चिम रेल्वेकडून निवड केली जाईल, त्या उमेदवारांच्या पदानुसार विभागाकडून 5200 ते 20200 रुपये प्रति महना पगार देण्यात येईल.
पश्चिम रेल्वेच्या नोकरीसाठी विनामूल्य अर्ज सबमिट करू शकता, अधिक माहितीसाठी विभागाची अधिसूचना तपासा. (Recruitment for various posts in the Railways including Paramedical Staff, know Detailed Information)
बॉलिवूडवर कोरोनाचं सावट, अक्षय कुमार पाठोपाठ गोंविंदाही कोरोना पॉझिटिव्ह https://t.co/whwbFslqCi @govindaahuja21 @akshaykumar #Govinda #coronavirus #CoronaUpdate #bollywood #BollywoodBreaking
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 4, 2021
इतर बातम्या
Chanakya Niti | आचार्य चाणक्य यांच्यानुसार एका पुरुषामध्ये ‘हे’ चार गुण असायलाच हवे…
VIDEO | ट्राफिक जॅममुळे बाचाबाची, नगराध्यक्षांनी कानाखाली पेटवल्याने भररस्त्यात हाणामारी