RPSC JLO Recruitment 2023 : एलएलबी पास तरुणांसाठी नोकरीची संधी, आजपासून करू शकता अर्ज

| Updated on: Jul 10, 2023 | 5:24 PM

rpsc.rajasthan.gov.in या RPSC च्या वेबसाइटद्वारे उमेदवार अर्ज करू शकतात. लेखी परीक्षेद्वारे त्यांची निवड केली जाईल.

RPSC JLO Recruitment 2023 : एलएलबी पास तरुणांसाठी नोकरीची संधी, आजपासून करू शकता अर्ज
Follow us on

RPSC JLO Recruitment 2023 : एलएलबी उत्तीर्ण झाल्यानंतर सरकारी नोकरीसाठी शोधाशोध करणाऱ्या, तयार करणाऱ्या तरूणांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. राजस्थान लोकसेवा आयोगाने कनिष्ठ विधी अधिकारी (JLO) 2023 पदांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. यासाठी आज, म्हणजेच 10 जुलै 2023 पासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. rpsc.rajasthan.gov.in या अधिकृत वेबसाइटद्वारे उमेदवार 9 ऑगस्ट 2023 पर्यंत ऑनलाइन पद्धतीने या पदासाठी अर्ज करू शकतात.

ज्युनिअर लीगल ऑफीसरच्या एकूण 140 पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच आयोगाने भरती परीक्षेचा अभ्यासक्रम आणि पॅटर्नही प्रसिद्ध केला आहे. RPSC च्या वेबसाइटवर उमेदवार तो अभ्यासक्रम व पॅटर्न पाहू शकतात. ज्यांच्याकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून एलएलबी (LLB) पदवी असेल तेच उमेदवार या पदांसाठी नोंदणी करू शकतात,

वयाची सीमा किती ?

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे किमान वय 21 वर्षे तर वयाची कमाल मर्यादा 40 वर्षे इतकी आहे. त्याचबरोबर राखीव प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादेतही सवलत देण्यात आली आहे. उमेदवारांना अर्ज करताना जात प्रमाणपत्र द्यावे लागेल.

ॲप्लीकेशन फी – सामान्य श्रेणी, बीसी (क्रिमी लेयर) आणि ईबीसी (क्रिमी लेयर) मधील उमेदवारांना 600 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. दुसरीकडे, BC (नॉन-क्रिमी लेयर), EBC (नॉन-क्रिमी लेयर), EWS, SC आणि इतर राखीव वर्गातील अर्जदारांना 400 रुपये इतके अर्ज शुल्क भरावे लागेल.

असा करा अर्ज

– RPSC च्या अधिकृत वेबसाइट rpsc.rajasthan.gov.in वर जा.

– होम पेज वरील RPSC ऑनलाइन टॅबवर क्लिक करा.

– त्यानंतर अप्लाय ऑनलाइन यावर क्लिक करा.

– रजिस्ट्रेशन करा आणि अर्ज प्रक्रिया सुरू करा

– डॉक्युमेंट्स अपलोड करा आणि फी भरा.

– त्यानंतर सबमिटवर क्लिक करा.

कशी असते निवड प्रक्रिया ?

या पदांसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षेद्वारे केली जाईल. ऑक्टोबर 2023 मध्ये ही परीक्षा होणार आहे. अधिक तपशिलांसाठी, उमेदवार जारी केलेली नोटिफिकेशन चेक करू शकतात.