मुंबई: राज्यसभा खासदार संभाजी छत्रपती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून एमपीएससी परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना वाढीव दोन संधी मिळावी अशी मागणी केली आहे. कोरोनामुळं दोन वर्ष जाहिरात निघाली नाही, काही विद्यार्थ्यांची वयोमर्यादा संपली आहे. गेल्या तीन चार वर्षांपासून परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना नुकत्याच जाहीर झालेल्या परीक्षांचे अर्ज करता येत नाहीत, असं संभाजी छत्रपती यांनी म्हटलंय.
प्रति,
मान.श्री. उद्धव ठाकरे जी,
मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य,
मंत्रालय, मुंबई-32
विषय: स्पर्धा परीक्षा उमेदवारांना परीक्षा देण्यासाठी वाढीव 2 संधी मिळणेबाबत
माननीय महोदय,
वरील विषयास अनुसरून आपणांस विनंती करण्यात येते की, कोविड -19 मुळे मागील 2 वर्षात नोकर भरती साठी नवीन जाहिराती प्रसिद्ध करण्यात न आल्याने खुल्या गटासह इतर प्रवर्गातील उमेदवारांनी आपली वयोमर्यादा ओलांडल्याने त्यांनाआता नुकत्याच MPSC द्वारे नवीन जाहिराती प्रसिद्ध होत असलेल्या परीक्षेसाठी फॉर्म भरता येत नाही.
हे उमेदवार मागील 3 ते 4 वर्षांपासून सरकारी नोकरी साठी अभ्यास करीत आहे. मागील 2 वर्षात जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही. त्यामुळे या उमेदवारांची वयोमर्यादा संपुष्टात आली असल्याने त्यांची परीक्षा देण्याची संधी ह्या उमेदवारांची काही चूक नसताना हिरावून घेतली जात आहे.
यांना मानवतेच्या दृष्टिकोनातून विचार करून यांना 2 वाढीव संधी उपलब्ध करून द्यायला हव्यात. यात सर्वात जास्त नुकसान हे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांचे झाले आहे.
देशातील विविध राज्यांनी देखील उमेदवारांच्या हिताचा निर्णय घेऊन त्यांना वाढीव संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. 2019-2020 आणि 2020-2021 या 2 वर्षात ज्या उमेदवारांची वयोमर्यादा ओलांडली आहे. अशा उमेदवारांना 2 संधी उपलब्ध करून देण्यात यावी ही विनंती.
कळावे,
आपला
संभाजी छत्रपती
मागील २ वर्षात कोविडमुळे MPSC परीक्षा न झाल्याने वयोमर्यादा वाढवून देण्याची ग्वाही शासनाने दिली होती. ती अद्यापही वाढवण्यात आलेली नाही. काहीही दोष नसताना तयारी करूनही विद्यार्थी ‘एजबार’ होत आहेत. शासनाने सर्व विद्यार्थ्यांना सरसकट २ वर्ष वाढीव संधी देण्याचा निर्णय घ्यावा. pic.twitter.com/4sKWDYGOWA
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) October 29, 2021
इतर बातम्या:
सफरचंदाच्या शेतीला आता केंद्र सरकारचेही प्रोत्साहन, उत्पादन वाढीवर लक्ष केंद्रीत
Sambhaji Chhatrapati wrote letter to Uddhav Thackeray to gave two more chance to students for appear MPSC exam who agebar due to corona time