SBI PO Prelims Result 2021: स्टेट बँक प्रोबेशनरी ऑफिसर्स पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर, असा पाहा निकाल

| Updated on: Jan 19, 2021 | 12:20 PM

SBI PO Prelims Result 2021 या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे.

SBI PO Prelims Result 2021: स्टेट बँक प्रोबेशनरी ऑफिसर्स पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर, असा पाहा निकाल
एसबीआयने स्वातंत्र्याच्या अमृतवर गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज इत्यादी सवलती देखील जाहीर केल्यात. गृह कर्जाच्या विशेष योजनेंतर्गत एसबीआयने शून्य प्रक्रिया शुल्क अर्थात ते पूर्णपणे माफ करण्याची घोषणा केली आणि महिलांसाठी योनो अॅपद्वारे अर्ज करणाऱ्या सर्व लोकांसाठी, व्याजावर 0.05 टक्के सवलत दिली.
Follow us on

नवी दिल्ली: भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडियानं एसबीआय प्रोबेशनरी ऑफिसर पूर्व परीक्षा 2020-21 (SBI PO Prelims Result 2021)चा निकाल जाहीर केला आहे. एसबीआय प्रोबेशनरी ऑफिसर परीक्षेचा निकाल उमेदवारांना स्टेट बँकेची अधिकृत वेबसाईट sbi.co.in/careers वर पाहता येणार आहे. उमेदवारांना निकाल पाहायचा असल्यास वेबसाईटवर नोंदणी क्रमांक आणि जन्म तारीख टाकून लॉगीन करावं लागेल.  (SBI PO Prelims Result 2020-21 Declared how will you check)

स्टेट बँक ऑफ इंडियाकडून 4, 5 आणि 6 जानेवारीला प्रोबेशनरी ऑफिसर्स पूर्व परीक्षा घेण्यात आली होती. देशातील विविध परीक्षा केंद्रांवर या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. एसबीआय प्रोबेशनरी ऑफिसर्स पूर्व परीक्षेत क्वालिफाय झालेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षा द्यावी लागणार आहे. प्रोबेशनरी ऑफिसर्स मुख्य परीक्षेची अ‌ॅडमिट कार्ड येत्या काही दिवसांमध्ये स्टेट बँकेच्या पोर्टलवर उपलब्ध होणार आहे. मुख्य परीक्षा 29 जानेवारी रोजी होण्याची शक्यता आहे. एसबीआय प्रोबेशनरी ऑफिसर पूर्व परीक्षा 2020-21 दोन हजार पदांसाठी घेण्यात आली होती.

स्टेट बँक प्रोबेशनरी ऑफिसर्स पूर्व परीक्षेची गुणवत्ता यादी प्रवर्गानुसार जाहीर केली जाते. जेवढ्या पदांची भर्ती करायची आहे त्याच्या दहापट उमेदवारांना मुख्य परीक्षेला संधी दिली जाते.

प्रोबेशनरी ऑफिसर्स पूर्व परीक्षेचा निकाल कसा पाहणार

1. उमेदवारांना प्रथम sbi.co.in/careers या वेबासाईटवर जावं लागेल
2. होमपेजवर एसबीआय प्रोबेशनरी ऑफिसर पूर्व परीक्षा निकाल अशी लिंक असेल त्यावर क्लिक करा
3. यानंतर नवीन विंडो ओपन होईल
4. नव्या विंडोमध्ये नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड टाकल्यानंतर निकाल उपलब्ध होईल.

दरम्यान, एसबीआय प्रोबेशनरी ऑफिसर पूर्व परीक्षा 2020-21 चा निकाल जाहीर केल्यानंतर ट्रफिक वाढल्यानं वेबसाईट स्लो झाली असल्याचं समोर आलं आहे.

संबंधित बातम्या

JOBS | ‘इंडियन एअर फोर्स’ अधिकारी बनण्याची सुवर्ण संधी, ‘या’ तारखेपासून सुरु होणार अर्ज भरण्याची प्रक्रिया!

 नव्या वर्षात 32 हजार नव्या नोकऱ्यांची नांदी; 10 वी पासपासून PG पर्यंत शिकलेल्यांना सुवर्णसंधी

(SBI PO Prelims Result 2020-21 Declared how will you check)