SSC Constable GD 2021 Notification : केंद्रीय निमलष्करी दलांमध्ये कॉन्स्टेबलपदावर 10 वी पास उमेदवारांना मोठी संधी, 69 हजार पगार

| Updated on: Mar 25, 2021 | 12:59 PM

स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून केंद्रीय निमलष्करी पोलीस दलांमध्ये कॉन्स्टेबल (SSC GD Constable Recruitment 2021) भरती प्रक्रिया जाहीर केली आहे.

SSC Constable GD 2021 Notification : केंद्रीय निमलष्करी दलांमध्ये कॉन्स्टेबलपदावर 10 वी पास उमेदवारांना मोठी संधी, 69 हजार पगार
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

नवी दिल्ली : कर्मचारी चयन आयोग म्हणजेच स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून (SSC) केंद्रीय निमलष्करी पोलीस दलांमध्ये कॉन्स्टेबल (SSC GD Constable Recruitment 2021) भरती प्रक्रिया जाहीर केली जाणार आहे. सीमा सुरक्षा बल (BSF), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (CISF), केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF),इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलीस (ITBP), सशस्त सीमा बल (SSB),नॅशनल इनवेस्टिगेशन एजन्सी(NIA ) आणि सचिवालय सुरक्षा बल (SSF)आसाम रायफल्समधील भरती प्रक्रियेबाबत आज अधिकृत घोषणा होणार आहे. या भरतीसाठी 2 ऑगस्ट ते 25 ऑगस्टला ऑनलाईन पद्धतीनं परीक्षा होईल. (SSC GD constable recruitment 2021 SSC pass candidates can apply notification release today)

10 वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी

स्टाफ सिलेक्शन कमिशननं जाहीर केलेल्या परीक्षांच्या कॅलेंडरनुसार 10 मेपर्यंत जीडी कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज करता येणार आहेत. 10 वी उत्तीर्ण उमेदवार या पदासाठी अर्ज करु शकतात. उमेदवारांची निवड कॉम्प्युटर आधारित टेस्ट, शारीरीक क्षमता, मेडिकल टेस्ट याच्या आधारावर केली जाणार आहे. उमदेवार https://ssc.nic.in/SSCFileServer/Portal Management/UploadedFile या लिकंवर जाऊन अधिक माहिती जाणून घेऊ शकतात. तिथे निमलष्करी दल निहाय अधिकृत नोटिफिकेशन पाहू शकता.

निवड प्रक्रिया

स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून जीडी कॉन्स्टेबल पदासाठी 55915 जागांवर भरती प्रक्रिया होणार आहे. त्यामध्ये 47582 जागा पुरुष उमेदवारांसाठी तर 8333 जागा महिला उमेदवारांसाठी ठेवण्यात आल्या आहेत. 2018 मध्ये 60210 मध्ये पदांसाठी भरतीची जाहिरात देण्यात आली होती. त्याचा निकाल जानेवारी 2021 मध्ये जाहीर झाला होता.

वयाची अट

जीडी कॉन्स्टेबल पदासाठी 21700-69100 इतक वेतन दिलं जाते. कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज करणारा उमेदवार 10 वी उत्तीर्ण असणं आवश्यक असून त्याचं वय 18 ते 23 च्या दरम्यान असणं आवश्यक आहे. ऑनलाईन परीक्षेमध्ये सामान्यज्ञान, गणित, हिंदी आणि इंग्रजी, तार्किक क्षमता याविषयी प्रश्न विचारले जातात. यासाठी खुल्या प्रवर्गासाठी 100 रुपये परीक्षा फी आहे. तर, महिला, एससी, एसटी आणि माजी सैनिकांसाठी कोणतीही फी नाही.

संबंधित बातम्या:

NIFT Recruitment 2021 : नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीमध्ये प्राध्यापक पदांसाठी भरती, जाणून घ्या तपशील

India Post Jobs : दहावी पास उमेदवारांसाठी टपाल विभागात बंपर भरती, परीक्षेविना होणार नियुक्ती, जाणून घ्या संपूर्ण तपशील

(SSC GD constable recruitment 2021 SSC pass candidates can apply notification release today)