SSC JE 2023 : कर्मचारी निवडणूक आयोगात मेगा भरती, या पदासाठी उमेदवारांना संधी

| Updated on: Jul 28, 2023 | 3:37 PM

SSC JE 2023 : केंद्रीय कर्मचारी निवडणूक आयोगात मेगा भरती होत आहे. विविध पदासाठी भरतीची अधिसूचना काढण्यात आली आहे. 1300 हून अधिक पदासाठी या तारखेपूर्वी अर्ज करावा लागेल. तर परीक्षा या दिवशी होईल.

SSC JE 2023 : कर्मचारी निवडणूक आयोगात मेगा भरती, या पदासाठी उमेदवारांना संधी
Follow us on

नवी दिल्ली | 28 जुलै 2023 : केंद्रीय कर्मचारी निवडणूक आयोगात (SSC ) मेगा भरती होत आहे. विविध पदासाठी भरतीची अधिसूचना काढण्यात आली आहे. एसएससीने कनिष्ठ अभियंता ( सिव्हिल, मॅकेनिकल आणि इलेक्ट्रिल) परीक्षा 2023 साठी अधिसूचना काढली आहे. या पदाविषयीची सविस्तर माहिती (SSC JE Notification 2023 Released) उमेदवारांना ssc.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर मिळेल. याच ठिकाणी पद भरतीविषयीचा तपशील मिळेल. केंद्र सरकारच्या विविध विभागात नोकरी मिळेल. केंद्र सरकारच्या सीपीडब्ल्यूडी, एमईएस, बीआरओ, एनटीआरओ या विभागात इंजिनिअर्स पदासाठी ही भरती होईल. 1300 हून अधिक पदासाठी या तारखेपूर्वी अर्ज करावा लागेल. तर परीक्षा या दिवशी होईल.

ही आहे अंतिम मुदत

एसएससीच्या या पदासाठी अर्ज करण्यासाठी लिंक एक्टिव्ह करण्यात आली आहे. या पदासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 16 ऑगस्ट 2023 ही आहे. शुल्क अदा करण्याची पण हीच अंतिम मुदत आहे. तर अर्जात दुरुस्ती, बदल करण्यासाठी 17 ते 18 ऑगस्ट 2023 ही अंतिम मुदत आहे. त्यानंतर उमेदवारांना अर्जात दुरुस्ती करता येणार नाही.

हे सुद्धा वाचा

या महिन्यात परीक्षा

या पदासाठी ऑक्टोबर 2023 महिन्यात परीक्षा होईल. परीक्षेची तारीख अजून ही निश्चित नाही, तिची घोषणा करण्यात आलेली नाही. परीक्षेच्या तारखेविषयी अपडेट ssc.nic.in या संकेतस्थळावर मिळेल.

पगार मिळेल इतका

या पदावर लगेचच निवड होत नाही. अनेक चाचणीनंतर पदावर निवड होते. कम्प्युटर आधारीत परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. निवड झालेल्या उमेदवारांना ग्रुप बी (नॉन-गॅझेटेड) श्रेणीच्या आधारे 35,400 ते 1,12,400 रुपये महिना पगार मिळेल.

एकूण इतक्या पदासाठी भरती

विविध पदासाठी शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. तुम्हाला केंद्रीय कर्मचारी निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर याविषयीची सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. एकूण 1324 पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येईल.

इतके द्यावे लागेल शुल्क

SSC JE 2023 पदासाठी अर्ज करता येईल. त्यासाठी 100 रुपये शुल्क आकारण्यात येते. महिला उमेदवार, एससी, एसटी. पीडब्ल्यूडी आणि माजी कर्मचारी यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येणार नाही.

सीसीआयएलमध्ये नोकर भरती

भारतीय कापूस महामंडळात नोकर भरती (CCIL Recruitment 2023) होत आहे. तरुणांना मोठी संधी आहे. मॅनेजमेंट ट्रेनी आणि ज्युनिअर कमर्शिअल एक्झिक्युटिव्ह या पदासाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 13 ऑगस्ट 2023 रोजी ही आहे.