SSC MTS Result 2024: कुठे आणि कसा तपासावा एसएससी एमटीएस निकाल? 9583 पदांसाठी भरती

| Updated on: Jan 02, 2025 | 10:57 AM

एसएससी एमटीएस परीक्षा 2024 चा निकाल लवकरच जाहीर केला जाऊ शकतो. निकाल जाहीर झाल्यानंतर उमेदवार कर्मचारी निवड आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ते तपासू शकतात. परीक्षा ३० सप्टेंबर २०२४ रोजी सुरू झाली आणि त्याची तात्पुरती प्रोव्हिजनल उत्तरपत्रिका २९ नोव्हेंबर २०२४ रोजी जाहीर करण्यात आली.

SSC MTS Result 2024: कुठे आणि कसा तपासावा एसएससी एमटीएस निकाल? 9583 पदांसाठी भरती
SSC MTS Result 2024
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

स्टाफ सिलेक्शन कमिशनने (एसएससी) एमटीएस परीक्षा 2024 चा निकाल अद्याप जाहीर केलेला नाही, परंतु लवकरच निकाल जाहीर होईल. तसेच मल्टी टास्किंग (नॉन-टेक्निकल) स्टाफ आणि हवालदार (सीबीआयसी आणि सीबीएन) परीक्षा 2024 (टियर -1) लेखी परीक्षेस बसलेले सर्व उमेदवारांना एसएससी परीक्षेच्या ssc.gov.in च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन निकाल पाहू शकतात. निकालासोबत कट ऑफ यादीही जाहीर करण्यात येणार आहे. एसएससी मल्टी टास्किंग स्टाफ म्हणजेच एमटीएस भरती परीक्षेला बसणारे उमेदवार निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

एसएससी एमटीएस भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 27 जून 2024 रोजी सुरू झाली. उमेदवारांना यासाठी अर्ज करण्यासाठी 3 ऑगस्ट 2024 पर्यंतमुदत देण्यात आली होती. ही परीक्षा 30 सप्टेंबर 2024 ते 14 नोव्हेंबर 2024 या कालावधीत घेण्यात आली होती. यात सहभागी झालेले उमेदवार खाली दिलेल्या स्टेप्सवरून निकाल पाहू शकतील.

SSC MTS Result 2024: निकाल कसा चेक करावा?

सर्वप्रथम एसएससीच्या अधिकृत ssc.gov.in या संकेतस्थळावर जाऊन .

वेबसाइटच्या होम पेजवरील SSC MTS and Havaldar Result 2024 च्या लिंकवर क्लिक करा.

त्यानंतर होम पेजवरील Result विभागात जा.

आता पर्यायाकडे जा.

त्यानंतर एमटीएस आणि हवालदार रिझल्ट पेज ओपन करा.

आता पीडीएफ डाऊनलोड करा आणि रोल नंबर वापरून तुमचा निकाल तपासा.

निकाल तपासल्यानंतर प्रिंट काढून घ्या.

SSC MTS Recruitment 2024: किती पदे भरणार?

एसएससी मल्टी टास्किंग स्टाफ रिक्रूटमेंट परीक्षेच्या माध्यमातून एकूण ९५८३ पदांची भरती होणार आहे. मल्टी टास्किंग स्टाफच्या एकूण ६१४४ पदांची भरती करण्यात येणार आहे. याशिवाय हवालदाराच्या ३४३९ पदांवर भरती होणार आहे. या भरतीत हवालदार पदाच्या लेखी परीक्षेत निवड झालेल्या उमेदवारांना शारीरिक परीक्षा द्यावी लागणार आहे. शारीरिक चाचणीसाठी एसएससीने काही पात्रता निश्चित केल्या आहेत.

SSC MTS Result: शेवटचा निकाल कधी जाहीर झाला?

यापूर्वी एसएससी एमटीएस 2023 पेपर-1 परीक्षेचा निकाल जानेवारी 2024 मध्ये जाहीर करण्यात आला होता. एमटीएस आणि हवालदार भरतीसाठी २ मे, १९ मे आणि १३ ते २० जून २०२३ दरम्यान परीक्षा घेण्यात आली होती, तर परीक्षेची उत्तरपत्रिका २८ जून रोजी जाहीर करण्यात आली होती.

अधिक माहितीसाठी उमेदवार कर्मचारी निवड आयोगाच्या ssc.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.