SSC JE 2020 Answer Key Released नवी दिल्ली: स्टाफ सिलेक्शन कमिशननं (Staff Selection Commission) ज्युनिअर इंजिनिअर भरती परीक्षेची उत्तर तालिका जाहीर केली आहे. ही उत्तर तालिका आयोगाच्या ssc.nic.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. परीक्षा दिलेले उमेदवार या वेबसाईटवर भेट देऊन ज्युनिअर इंजिनिअर परीक्षेची उत्तरतालिका (SSC JE 2020 Answer Key) पाहू शकतात. उत्तरतालिकेवर आक्षेप असल्यास ते नोंदवण्यासाठी 9 एप्रिल सांयकाळी 6 वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. मात्र उत्तरतालिकेवर आक्षेप नोंदवायचा असल्यास प्रत्येक आक्षेपाला 100 रुपये फी भरावी लागणार आहे. (Staff Selection Commission Junior Engineer exam 2020 answer key released)
स्टेप 1: उमेदवारांनी स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या ऑफिशियल वेबसाईट ssc.nic.in वर भेट द्यावी.
स्टेप 2: वेबसाईटवरील ‘Junior Engineer (Civil, Mechanical, Electrical and Quantity Surveying & Contract) Examination – 2020: Uploading of Candidates’ Response sheet(s) along with Tentative Answer Keys’ या लिंकवर क्लिक करा
स्टेप 3: यानंतर एक पीडीएफ फाईल ओपन होईल, त्याच्या शेवटी एक लिंक असेल त्यावर क्लिक करा
स्टेप 4: लॉगीन करण्यासाठी तुमचा रोल नंबर आणि पासवर्ड भरा
स्टेप 5: यानंतर तुम्हाला तुमची उत्तरतालिका दिसेल, त्यावर क्लिक करा, डाऊनलोड करुन प्रिंट आऊट घ्या.
स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे SSC JE 2020 परीक्षेचे आयोजन 22 ते 24 मार्च दरम्यान देशातील विविध परीक्षा केंद्रांवर करण्यात आले होते. एसएसीच्या मध्य विभागाच्या अंतर्गत उत्तर प्रदेश आणि बिहारमधील 17 शहरांमध्ये 1,29,061 उमेदवार ऑनलाईन पद्धतीनं सहभागी झाले होते. परीक्षा दोन सत्रांमध्ये 10 ते 12 आणि 2 ते 4 या वेळेथ झाली. संपूर्ण देशात 6,57,638 उमेदवारांनी परीक्षा दिली.
Pariksha Pe Charcha 2021: परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात नरेंद्र मोदी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार, पालक पहिल्यांदाच सहभागी होणारhttps://t.co/ixCKWIguw7#NarendraModi | #PPC2021 | #ParikshaPeCharcha2021
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 7, 2021
SSC CGL 2018 Final Result लवकरचं जाहीर होणार
स्टाफ सिलेक्शन कमिशनतर्फे कंबाइन्ड ग्रॅज्युएट लेवल परीक्षा 2018 चा अंतिम निकाल लवकरच जाहीर केला जाणार आहे. एसएससी सीजीएल 2018 परीक्षेचा निकाल आयोगाची अधिकृत वेबसाईट ssc.nic.in वर उपलब्ध होईल. उमेदवारांना स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर जाऊन निकाल पाहता येईल.
संबंधित बातम्या:
SSC CGL 2018 Final Result | स्टाफ सिलेक्शन कमिशन सीजीएल 2018 परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करणार
(Staff Selection Commission Junior Engineer exam 2020 answer key released)